MI vs PBKS IPL 2025: सामना हरताच हार्दिक मैदानावर कोसळला, नीता अंबानींनी तर कपाळाला हात लावला; मुंबईच्या पराभवावर नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रीया

आयपीएल 2025 च्या हंगामातील क्वालिफायर-2 च्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह पंजाबने आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

MI vs PBKS IPL 2025: सामना हरताच हार्दिक मैदानावर कोसळला, नीता अंबानींनी तर कपाळाला हात लावला; मुंबईच्या पराभवावर नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रीया
PC-X

पंजाब किंग्सने तब्बल 11 वर्षांनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने 41 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी करून पंजाबच्या ऐतिहासिक विजयात मोठे योगदान दिले. सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मैदानावर बसला. आयपीएलमधीन बाहेर पडल्यामुळे हार्दिक भावनिक झाला होता. हार्दिक पांड्या भावूक झाल्याचे पाहताच पंजाबचा खेळाडू मार्कस स्टॉयनिसने त्याला धीर दिला. दुसरकीडे सर्वात चर्चेचा विषय निता अंबाणीचा ठरला. नीता अंबानी कपाळाला हाच लावून बसलेल्या दिसल्या.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील मोठा निराश झाला. आयपीएलची ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न भंगले. रोहित शर्माचा हा फोटो पाहून चाहते हळहळले.

सामना जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर रोहित शर्माला भेटल्याचे दिसून आले. यावेळी दोन्ही दिग्गज खेळाडूंनी एकमेकांना मिठी देखील मारली. दरम्यान आता आयपीएलची फयनल रोमांचक होणार आहे. कारण आयपीएलची ट्रॉफी नवा संघ मिळवेल. कारण पंजाब आणि आरसीबी दोघांनीही आयपीएल विजेत्याचा मान मिळवलेला नाही. ३ जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब संघात विजेतेपदासाठी लढत होईल.

श्रेयस अय्यरने 41 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी करून पंजाबच्या ऐतिहासिक विजयात मोठे योगदान दिले. चाहत्यांनी मिम्सच्या माध्यमातून भन्नाट प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2025 09:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).