IND vs PAK: हरभजन सिंहने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन निवडली, 'या' 4 खेळाडूंना दिले डच्चू

त्याने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंत किंवा आर अश्विनला स्थान दिलेले नाही.

File Image | Harbhajan Singh | (Photo Credits: IANS)

टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये, भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या महान सामन्यापूर्वी क्रिकेट दिग्गज आणि माजी क्रिकेटपटू भारतीय प्लेइंग इलेव्हन आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या शक्यतांबद्दल बरीच चर्चा करत आहेत. अशा परिस्थितीत भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंहनेही (Harbhajan Singh) पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. त्याने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंत किंवा आर अश्विनला स्थान दिलेले नाही. वेगवान गोलंदाजीत त्याने मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारसह अर्शदीपला घेतले आहे. हरभजनने हर्षल पटेललाही पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे.

अश्विनला संघात स्थान नाही

स्टार स्पोर्टसशी साधलेल्या संवादानुसार त्याने सांगितले मी निवडलेली ही टीम साधी आहे. मी निवडलेल्या टीम मध्ये मला अस वाटत की रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, आणि अक्षर पटेल असेल. तसेच या टीम सोबत चहलही असेल. तसेच त्यानंतर अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी टीमचा हिस्सा असेल. हरभजन सिंहने या दरम्यान अश्विनला का संघात घेतले नाही याचे कारण ही सांगितले आहे. तो म्हणाला की टी-20 मध्ये भारत त्याच्या फलंदाजीवर जास्त विश्वास ठेवु शकत नाही, तसेच अक्षर पटेल गोलंदाजी सोबत फलंदाजीपण चांगले योगदान देतो. (हे देखील वाचा: T20 World Cup: टी-20 विश्वचषकातील IND vs PAK सामन्यावर पावसाचे सावट, चाहत्यांच्या उत्सहावर पाणी फिरण्याची शक्यता)

मोहम्मद शमीचे केले कौतुक 

तसेच हरभजन सिंहने मोहम्मद शमीचे कौतुक केले आहे. शमीला बुमराहच्या जागी संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी वाढली आली आहे. तो म्हणाला की शमी तंदुरुस्त असणे हे भारतीय संघासाठी चांगले लक्षण आहे. तो कोणत्या प्रकारचा गोलंदाज आहे, मोठ्या मंचावर अनुभवाला खूप महत्त्व आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत शमीची भूमिका आणखी मोठी होते. आम्हाला आशा आहे की तो त्या अपेक्षा पूर्ण करेल.