Virat Kohli Trolls Hardik Pandya: हार्दिक पांड्याने भाऊ क्रुणालसोबत कॅरम खेळतानाचा फोटो केलाशेअर, पाहून विराट कोहली झाला लोटपोट (See Photo)
आज त्याने घरी भावांसोबत कॅरम खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला ज्याला यूजर्सकडून खूप पसंत केले जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने फोटोमध्ये एका गोष्टीकडे लक्ष वेधले आणि हसून-हसून लोटपोट झाला.
टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. आज त्याने घरी भावांसोबत कॅरम खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला ज्याला यूजर्सकडून खूप पसंत केले जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) फोटोमध्ये एका गोष्टीकडे लक्ष वेधले आणि हसून-हसून लोटपोट झाला. फोटो पोस्ट करत हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, "माझ्या भावांसोबत कॅरमचा खेळ खेळण्यासारखं दुसरं काही नाही. बर्याच आठवणी उजागर झाल्या." जर तुम्ही फोटो काळजीपूर्वक पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हार्दिकचा हात कॅरम बोर्डवर असून तो भाऊ क्रुणालकडे (Krunal Pandya) एकटक पाहत आहे. ही गोष्ट कोहलीच्या देखील लक्षात आली आणि त्याने आपल्या प्रतिक्रिये स्वतः समवेत यूजर्सनाही हसून-हसून लोटपोट केले. (हे U-19 नाहीये, मार ना! रणजी ट्रॉफी स्पर्धेत जेव्हा हार्दिक पांड्याने शुभमन गिलला केले स्लेज, पाहा काय घडले होते)
कोहलीने हार्दिकचा फोटो पाहिला आणि लगेच हसत हसत प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याने लिहिले की, :तुम्ही तुमच्या डावाची वाट पहात आहे की क्रुणालला पहिले घाबरावयाचा प्रयत्न करीत आहे? फळावर हात आणि कृणालवर डोळा..." हार्दिकने पोस्ट शेअर केल्यावर काही तासातच पोस्ट व्हायरल झाली.
View this post on Instagram
Nothing like a great game of carrom with my brothers 🤗 Brings back a lot of memories #PandyaBrothers
A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on
पाहा विराटची प्रतिक्रिया:
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मागील तीन महिन्यांपासून ठप्प आहे. 8 जुलै पासून इंग्लंड-वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार असून भारतीय टीमचा श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौरा रद्द करण्यात आला आहे. शिवाय, इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) बाबतही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 28 मार्चपासून सुरु होणारं आयपीएल पहिले 15 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आले होते, मात्र नंतर लॉकडाऊन वाढल्याने बीसीसीआयने टूर्नामेंट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. असे असूनही बीसीसीआय ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित टी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्यास आयपीएलचे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयोजन करण्यास उत्सुक आहे.