आपले खरे नाव ठेव! Global T20 लीगमध्ये ड्वेन ब्राव्हो याच्या जर्सी वर 'चॅम्पियन टॅग' पाहून सायमन डौल संतापले

Winnipeg Hawksयांचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने त्याच्या 47 नंबर च्या जर्सीवर ‘चॅम्पियन’ हे नाव लिहिलेले पाहून न्यूझीलंडचा माजी गोलंदाज सायमन डौल नाराज झाले.

ड्वेन ब्राव्हो (Photo Credit: @PeterDellaPenna/Twitter)

आधुनिक क्रिकेटने कधीही आश्चर्यचकित केले नाही असे नाही. कौशल्य असो किंवा पोशाख, क्रिकेटपटू आज करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत थरार व आश्चर्य वाटण्यासारखे घटक असतात. आणि बर्‍याच वेळा आधुनिक काळातील खेळाडू अशा नाविन्यपूर्ण गोष्टींमुळे अप्रभावित दिसतात. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने आपल्या जर्सीच्या मागील बाजूस ‘डीके’ (DK) आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू फखर जमान (Fakher Zaman) याने आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेत गोलंदाजी करताना पाकची टोपी मागील बाजूस घातल्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) चांगलेच नाराज झाले. सोमवारी कॅनडाच्या ब्रॅम्प्टनमध्ये ग्लोबल टी-20 मध्ये झालेल्या एका सामन्यादरम्यान अशीच एक घटना पाहायला मिळाली. (पागल आहेस? Global T20 सामन्यादरम्यान शाहिद आफ्रिदी आणि वहाब रियाझ यांच्यातील हास्यास्पद संवाद स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड)

विनिपेग हॉक्स (Winnipeg Hawks) यांचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) याने त्याच्या 47 नंबर च्या जर्सीवर ‘चॅम्पियन’ हे नाव लिहिलेले पाहून न्यूझीलंडचा माजी गोलंदाज सायमन डौल (Simon Doull) चांगलाच भडकला होता. डौलने कबूल केले की कदाचित तो थोडासा 'पेडेन्टिक' वाटेल पण त्याला ही कल्पना आवडली नाही. “मला आवडत नाही… तुझं खरं नाव ठेव!,”49 वर्षीय डौलने Reddit.com ला म्हटले. वेस्ट इंडीयन ब्राव्होला ‘चॅम्पियन’ असे टोपणनाव देण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले की, "ही एक नवीन स्पर्धा आहे. आपण हे खेळाडू कोण आहेत हे लोकांना जाणवून देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करीत आहात. खेळाच्या सुपरस्टार्स ओळखा. होय, कदाचित त्याला असे वाटेल की हे मस्त आहे. पण आपले खरे नाव आपल्या शर्टवर घाला जेणेकरुन हा खेळ पाहण्यासाठी येणारी तरुण मुलं, वृद्ध चाहते, पुरुष आणि स्त्रिया यांना तुम्ही नक्की कोण आहे हे समजू शकेल. तो ड्वेन ब्राव्हो आहे. ते ‘चॅम्पियन’ नाही! काय तो चॅम्पियन."

2016 मध्ये वेस्ट इंडीजकडून अखेरचा सामना खेळलेल्या ब्राव्होने मागील वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 450 सामने खेळले असून 6000 धावा आणि 490 विकेट्स घेतल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now