KPL Match Fixing: बॅट बदलत, स्लीव्ह्स फोल्ड करून फलंदाज देत होता बुकीला सिग्नल; 10 पेक्षा कमी धावा करण्यासाठी मिळायले होते 5 लाख रुपये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टच्या सामन्यात फलंदाजी करताना विश्वनाथनने आपली बॅट बदलली आणि तिसरी ओव्हर संपल्यानंतर त्याने त्याच्या शर्टची सलिव्हजही वळवली. हे दोन्ही संकेत बुकींसाठी केले गेले होते

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मॅच फिक्सिंगची ऑफर मिळाल्या बाबतची माहिती लपवल्याबाबत बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन याला दोन वर्षासाठी बंदी घातली. आता याच प्रकरणात कर्नाटक प्रीमियर लीगसंदर्भातही मोठी माहिती समोर आली आहे. यामध्ये हे क्रिकेटपटू थेट सामन्यात बुकीला कसे संकेत पाठवायचे हे सांगितले आहेत. बेंगळुरू पोलीसने काही दिवसांपूर्वी कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली बेंगलुरू ब्लास्टर्सचा (Bengaluru Blasters) फलंदाज एम विश्वनाथन (M Vishwanathan) याला अटक केली आहे. बुकींनी विश्वनाथनला हुबळी टायगर्स संघाविरुद्ध मॅचमध्ये 20 चेंडूत 10 पेक्षा कमी धावा करण्यासाठी 5 लाख रुपये दिले होते. विश्वनाथनला 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या कर्नाटक प्रीमियर लीग (Karnataka Premier League) मधील फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या सामन्यात विश्वनाथनने 17 चेंडूत 9 धावा केल्या होत्या. (शाकिब अल हसन याचे कथित भारतीय बुकीसह WhatsApp चॅट उघडकीस, IPL 2018 मध्ये फिक्सिंगची दिली होती ऑफर)

गेल्या आठवड्यात विश्वनाथनला बेंगलोर ब्लास्टर्सचे गोलंदाजी प्रशिक्षक वीणू प्रसाद (Vinu Prasad) याच्यासह अटक करण्यात आली होती. विश्वनाथन आणि प्रसाद कर्नाटक प्रीमियर लीग 2018 च्या 18 व्या सामन्यात चंडीगडचा बुकी मनोज कुमार उर्फ मोंटीच्या माध्यमातून स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी झाले होते. पोलिसांच्या तपासणीनुसार शिमोगा लायन्सचे निशांतसिंग शेखावत यांनी मनोज कुमार यांना प्रसादला भेटवण्याचे काम केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टच्या सामन्यासाठी स्पॉट फिक्सिंगचा निर्णय आठवडाभरापूर्वी घेण्यात आला होता. प्रसादने हॉटेलमध्ये भेट दिली आणि सर्व काही ठरवले. मॅचच्या एक दिवसापूर्वी प्रसादने विश्वनाथनची भेट घेतली आणि मॅचदरम्यान बुकीला सिग्नल कसे द्यायचे आहे ते सांगितले. हुबली टायगर्सने बेंगळुरू ब्लास्टर्सला 118 धावांचे लक्ष्य दिले. विश्वनाथनला आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो, पण या सामन्यात त्याने 17 चेंडूत 9 धावा केल्या. सामन्यात फलंदाजी करताना आठ बॉल खेळल्यानंतर विश्वनाथनने आपली बॅट बदलली आणि तिसरी ओव्हर संपल्यानंतर त्यानेही आपली बाजूही शिफ्ट केली. हे दोन्ही संकेत बुकींसाठी केले गेले होते, ज्यांना पाहून ते स्पॉट फिक्सिंगमध्ये विश्वनाथनच्या सहभागाची पुष्टी करू शकेल.

पोलिस तपासानुसार प्रसाद अनेक सट्टेबाजांच्या संपर्कात होता आणि खेळाडूंना मॅच फिक्स करण्यासाठी प्रेरित करायचा. मनोज कुमार व्यतिरिक्त वेंकी आणि खान हे दोन अन्य बुकीही प्रसादशी संबंधित होते. विश्वनाथन आणि प्रसाद यांच्याविरूद्ध फसवणूक आणि गुन्हेगारीचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केपीएलच्या इतर काही खेळाडूंची नावेही समोर येऊ शकतात, असा विश्वास वर्तवला जात आहे.