भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचा माजी कर्णधार दिनेश सैन यांचा शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज

दिनेशने नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (National Anti Doping Agency) म्हणजेच ‘नाडा’मध्ये शिपाई पदासाठी अर्ज केला असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचा (Physically Challenged India Cricket Team) माजी कर्णधार दिनेश सैन (Dinesh Kumar Sain) याच्यावर शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला आहे. दिनेशने नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (National Anti Doping Agency) म्हणजेच ‘नाडा’मध्ये शिपाई पदासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. दिनेश सैन यांना गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामोरे जावा लागत आहे. त्यांनी 2015 ते 2019 भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचे नेतृत्वदेखील केले आहे. दिनेश सैन 35 वर्षाचे असून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी नोकरी शोधावी लागत आहेत, असे माहिती 'द इंडियन इक्स्पेसने' आपल्या वृत्तात दिले आहे.

“माझे वय 35 आहे. मी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला आहे. 12वी नंतर मी फक्त क्रिकेट खेळलो. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पण सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. ‘नाडा’मध्ये सध्या एक पद रिक्त आहे. त्यामुळे मी शिपाई पदासाठी अर्ज केला आहे”, असे त्याने सोनपत येथे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. सध्या दिनेशचा मोठा भाऊ कुटंबाचा आर्थिक भार उचलत आहेत. हे देखील वाचा- काय! विराट कोहली 4-5 दिवसांत 40 टॉफींचे पॅक खायचा, 2012 आयपीएलने अशा प्रकारे आहार व प्रशिक्षण बदलण्यास केले प्रवृत्त (Watch Video)

ट्वीट-

दरम्यान दिनेश म्हणाला की, या नोकरीसाठी सामान्य लोकांनासाठी 25 वर्षाची वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. तर, दिव्यांग व्यक्तीसाठी वयोमर्यादा 35 आहे. ज्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. देशासाठी खेळूनसुद्धा पैशांसाठी झटावे लागत आहे. जन्मता पोलिओमुळे माझा एक पाय काम करत नाही. 2015 मध्ये पाच देशांत झालेल्या टूर्नामेंटमध्ये मी सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरलो होतो. मी चार सामन्यांमध्ये 8 विकेट घेतले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif