David Trist Dies: न्यूझीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डेव्हिड ट्रिस्ट यांचे निधन; वयाच्या 77 व्या वर्षी
2000 च्या आयसीसी नॉकआउट ट्रॉफीमध्ये संघाला विजय मिळवून देणारे न्यूझीलंडचे माजी क्रिकेट प्रशिक्षक डेव्हिड ट्रिस्ट यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.
David Trist Dies: आयसीसी नॉकआउट ट्रॉफी 2000 मध्ये न्यूझीलंड संघाला (New Zealand) विजय मिळवून देणारे न्यूझीलंडचे माजी क्रिकेट प्रशिक्षक डेव्हिड ट्रिस्ट यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. प्रशिक्षकपदी येण्यापूर्वी ट्रिस्ट (David Trist) हे वेगवान गोलंदाज म्हणून 14 वर्ष खेळले. 1999 मध्ये स्टीव्ह रिक्सन यांच्या जागी न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी प्रशिक्षण प्रवासात दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि नेदरलँड संघांना प्रशिक्षण दिले.
जरी त्यांचा कार्यकाळ फक्त दोन वर्षांचा असला तरी, ट्रिस्टने न्यूझीलंडला आयसीसीचे पहिले मोठे जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नैरोबी येथे झालेल्या अंतिम सामन्यात संघाने भारतावर चार विकेट्सने विजय मिळवला, ज्यामध्ये क्रिस केर्न्सने नाबाद शतक झळकावले. तो विजय न्यूझीलंड क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण होता. त्यानंतर त्यांचा 2021 चा जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये विजय झाला.
न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघासोबतच्या त्याच्या प्रवासानंतर, ट्रिस्ट यांनी क्राइस्टचर्च येथील ओल्ड कॉलेजियन्स क्रिकेट क्लबमध्ये कोचिंग डायरेक्टर म्हणून क्रीकेटमध्ये त्यांचे योगदान दिले. त्यांनी भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांनी कोचिंग दिली आहे. "न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डेव्हिड ट्रिस्ट यांचे काल क्राइस्टचर्च येथे निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी जाण्याने एनझेड कुटुंबी आणि मित्र परिवार मनापासून शोक व्यक्त करते," असे न्यूझीलंड क्रिकेटने सोशल मीडियावरील एका निवेदनात म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2025 03:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

