IPL Auction 2025 Live

Virat Kohli-Rohit Sharma: चाहत्यांना विराट-रोहित पुन्हा दिसणार एकत्र, टीम इंडिया जुलैमध्ये जाणार श्रीलंका दौऱ्यावर; पाहा सामन्याचे वेळापत्रक

श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तेवढीच एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

Rohit Sharma And Virat Kohli (Photo Credit - X)

India vs Sri Lanka Schedule 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मधील (T20 World Cup 2024) धमाकेदार कामगिरीनंतर टीम इंडिया आता श्रीलंका (IND vs SL) दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा श्रीलंका दौरा 27 जुलैपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तेवढीच एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी होणार आहे. यानंतर दुसरा सामना 28 जुलैला आणि तिसरा आणि शेवटचा सामना 30 जुलैला खेळवला जाईल. हे सर्व टी-20 सामने संध्याकाळीच खेळवले जातील. या मालिकेसाठी आतापर्यंत दोन्ही देशांनी आपापल्या संघांची घोषणा केलेली नाही.

तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार

टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 4 ऑगस्टला तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 7 ऑगस्टला खेळवला जाईल. (हे देखील वाचा: Team India T20I Schedule: टी-20 विश्वचषक संपला, आता टीम इंडिया करणार या देशाचा दौरा; तारीख आणि वेळ लक्षात ठेवा)

टी-20 मालिकेचे वेळापत्रक-

पहिला टी-20 सामना- 27 जुलै

दुसरा टी-20 सामना- 28 जुलै

तिसरा टी-20 सामना- 30 जुलै

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक-

पहिला एकदिवसीय सामना- 2 ऑगस्ट

दुसरी एकदिवसीय सामना- 4 ऑगस्ट

तिसरा एकदिवसीय सामना- 7 ऑगस्ट

टी-20 मालिकेसाठी भारताचा संभाव्य 15 सदस्यीय संघ - शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संभाव्य 15 सदस्यीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, साई किशोर, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.