India vs Bangladesh, 2nd T20I Stats And Record Preview: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात होणार रोमांचक सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम

हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. याशिवाय 7 वाजता नाणेफेक होईल.

IND vs BAN (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने पहिला टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता बुधवारी, 9 ऑक्टोबर रोजी उभय संघांमध्ये दुसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. याशिवाय 7 वाजता नाणेफेक होईल. दुसरीकडे, टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत अजेय आघाडी मिळवायची आहे, तर बांगलादेश संघाला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे.

हेड टू हेड आकडेवारी

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 15 वेळा टी-20 सामना झाला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने 13 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला केवळ एकच विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाचा वरचष्मा दिसतो. भारताने पाचही सामन्यांमध्ये बांगलादेशचा पराभव केला आहे. तर बांगलादेशने एकही सामना जिंकलेला नाही. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd T20I Pitch And Weather Report: दुसऱ्या टी-20 मध्ये कशी असेल हवामानाची स्थिती? दिल्लीच्या खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत? जाणून घ्या संपूर्ण अहवाल)

आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम 

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2,500 धावा पूर्ण करण्यासाठी 39 धावांची गरज आहे.

टीम इंडियाचा युवा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 5 विकेट्सची गरज आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा युवा अनुभवी गोलंदाज रवी बिश्नोईला 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 2 विकेट्सची गरज आहे.

बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 65 धावांची गरज आहे.

बांगलादेशचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज लिटन दासला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2,000 धावा पूर्ण करण्यासाठी 53 धावांची गरज आहे.

बांगलादेशचा स्टार गोलंदाज शरीफुल इस्लामला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 बळींचा टप्पा गाठण्यासाठी 4 बळींची गरज आहे.

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू महमुदुल्लाला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 25 धावांची गरज आहे.

टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माला टी-20 क्रिकेटमध्ये 2,500 धावा पूर्ण करण्यासाठी 10 धावांची गरज आहे.

बांगलादेशचा स्टार गोलंदाज तस्किन अहमदला टी-20 क्रिकेटमध्ये 200 बळींचा टप्पा गाठण्यासाठी 5 विकेट्सची गरज आहे.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

टीम इंडिया 

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.

बांगलादेश 

लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ हुसेन आमोन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, जेकर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकीब, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.