Coronavirus संशयित माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मृत्यू, कुटुंबीयांनी घाईत दफन केला मृतदेह

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेखच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह घाईत दफन केला आणि मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांची प्रतिक्षाही केली नाही. शेख 51 वर्षाचे होते.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पाकिस्तानचा (Pakistan) माजी फर्स्ट-क्लास क्रिकेटपटू रियाज शेख (Riaz Sheikh) यांचा मंगळवारी संशयित कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संशयित कोरोनामुळे निधन होणारे शेख हे पाकिस्तानचे दुसरे व्यासायिक क्रिकेटपटू ठरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेखच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह घाईत दफन केला आणि मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांची प्रतिक्षाही केली नाही. शेख 51 वर्षाचे होते. त्यांनी 43 प्रथम श्रेणी सामन्यात 116 गडी बाद केले आहेत. सूत्रांनी सांगितले की, "त्याच्या कुटुंबीयांनी सकाळी घाईत त्यांचा मृतदेह दफन केला परंतु कोविड-19 संक्रमणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा त्यांच्या शेजार्‍यांना संशय आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांना व्हायरसमुळे मरण पावलेल्या रुग्णांसाठी तयार केलेल्या सरकारी प्रक्रियेतून जाण्याची इच्छा नव्हती." (Coronavirus: माजी एशियन गेम्स सुवर्ण पदक विजेता बॉक्सर Dingko Singh कोरोना पॉसिटीव्ह, कॅन्सरवर उपचारासाठी दिल्लीला पोहचले होते)

शेख हे पाकिस्तान क्रिकेटमधील एक नावाजलेले नाव होते. ते मोईन खानच्या अकादमीमध्ये प्रशिक्षक होते. यापूर्वी पाकिस्तानचा माजी प्रथम क्रिकेटर जफर सरफराजचा कोविड-19 संक्रमणामुळे मृत्यू झाला होता. जफर 50 वर्षांचे होते आणि एप्रिलमध्ये या व्हायरसमुळे त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कसोटी सलामी फलंदाज आणि राष्ट्रीय जुनिअर निवड समिती सदस्य तौफिक उमर कोरोनापासून बरे होत आहे. त्यांनी स्वत:ला घरात क्वारंटाइन केले आहेत.

मागील महिन्यात ईदपूर्वी सरकारने बंद आणि निर्बंध कमी केल्याने पाकिस्तानमध्ये कोरोना प्रकरणांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत जवळपास 76,5000 लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे, तर 1,621 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 2nd ODI 2024 Live Streaming: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून मालिकेत बरोबरी साधण्याचे दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य, जाणून घ्या भारतात सामना कधी, कुठे आणि कसा आनंद लुटता येणार

भारत-पाक फाळणीनंतर 77 वर्षांनी भारतात मूळगावी आलेले 92 वर्षीय Khurshid Ahmad झाले भावूक; गावकर्‍यांनी केले हार घालत स्वागत

PAK vs SA 1st ODI 2024 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे पाकिस्तानला 240 धावांचे लक्ष्य; हेनरिक क्लासेनच्या फलंदाजीने उडवला धुवा, पहा स्कोअरकार्ड

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif