England Women vs West Indies Women, 20th Match Pitch Report: दुबईमध्ये फलंदाज धावांचा पाऊस पाडणार किंवा गोलंदाजांची जादू पहायला मिळणार? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 20 वा सामना आज म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी इंग्लंड महिला संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यात होणार आहे. सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.
England Women National Cricket Team vs West Indies Women National Cricket Team 20th Match 2024 ICC Womens T20 World Cup Pitch Report: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेतील 20 वा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात (Eng vs WI) आज म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. इंग्लंड संघ टी 20 विश्वचषक(2024 ICC Womens T20 World Cup) स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. ज्यामध्ये तिन्हीवेळा विजयाची नोंद झाली आहे. उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के करण्यासाठी, इंग्लंड संघ वेस्ट इंडिजला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. त्याशिवाय, टी-20 विश्वचषकात सलग त्यांचा चौथा विजय नोंदवायचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, वेस्ट इंडिज संघाने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 सामन्यात विजय नोंदवला आहे. तर एकात पराभवाला सामोरे जावे लागले. (हेही वाचा:ENG W vs WI W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: टी 20 विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? येथे जाणून घ्या )
दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी
दोन्ही संघांमध्ये टी 20चे 28 सामने खेळले गेले आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडने 19 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजला केवळ 8 मध्ये विजय मिळवता आला आहे. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला आहे. महिला टी 20 विश्वचषकात आतापर्यंत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकूण 6 सामने झाले आहेत. ज्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत.
खेळपट्टीचा अहवाल
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त ठरते. या खेळपट्टीवर, वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये हलके स्विंग पाहू शकतात. तर, फलंदाजांनाही सुरुवातीला सावध राहावे लागेल. परंतु एकदा स्थिरावल्यानंतर खेळपट्टीवर मोठे फटके खेळणे सोपे होऊ शकते. याशिवाय, जसजसा सामना पुढे जाईल तसतसा गॅम संथ होण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. संघांना पहिल्या डावात किमान 140 धावा कराव्या लागतील. दुसऱ्या डावात दव पडल्यास त्याचा परिणाम गोलंदाजांवर होऊ शकतो, त्यामुळे फलंदाजी सोपी होऊ शकते.
हवामान परिस्थिती
दुबईतील हवामान दुपारच्या वेळी उष्ण आणि प्रकाशित असेल अशी अपेक्षा आहे. संध्याकाळी सामन्यादरम्यान हवामान उष्ण असेल. दिवसभर आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्यता नाही. तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
दोन्ही संघांमधील खेळाडू
इंग्लंड संघ: माया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट, हेदर नाइट (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लिन्से स्मिथ.
वेस्ट इंडिज संघ: हेली मॅथ्यू (कर्णधार), स्टॅफनी टेलर, कियाना जोसेफ, शमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, आलिया ॲलेने, मँडी मंगरू, एफी फ्लेचर, अश्मिनी मुनिसार, करिश्मा रामहरक.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)