IPL Auction 2025 Live

England Women vs South Africa Women T20 Head To Head Record: इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, कोण आहे तगडा संघ? हेड टू हेड आकडेवारी पहा

उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.

Photo Credit- X

England Women National Cricket Team vs South Africa Women National Cricket Team T20 Head To Head Record: 2024च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 9 वा सामना आज 7 ऑक्टोबर रोजी इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. टी-20 विश्वचषकात इंग्लंड संघाने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. इंग्लंडने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 21 धावांनी पराभव केला होता. अशा स्थितीत इंग्लंड संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनेही विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 10 विकेट्सने पराभव केला. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेचे लक्ष इंग्लंडला हरवून स्पर्धेत दुसरा विजय नोंदविण्याकडे असेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा:ENG W vs SA W ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: टी 20 विश्वचषकात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सामना; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल येथे जाणून घ्या? )

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ टी 20 मध्ये 24 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडने 19 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला केवळ 4 सामने जिंकता आले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला.

2009 टी-20 विश्वचषक विजेता इंग्लंड या वेळीही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच दिवशी विजयासह आपली तागद दाखवून दिली आहे. दोन्ही संघांना सोमवारी आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवायची आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

इंग्लंड महिला संघ: माईया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स (यष्टीरक्षक), डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लिनसे स्मिथ, सोफिया डंकले, लॉरेन बेल, बेस हीथ, फ्रेया केम्प

दक्षिण आफ्रिका महिला संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, अनेके बॉश, स्युने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, तुमी सेखलु, तुमी सेखलु, , शेषनी नायडू, माईक द नाईट