NZ vs ENG 1st Test 2024 Day 2 Preview: दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला ऑलआऊट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार इंग्लंडचा संघ, त्याआधी सामन्याबद्दल जाणून घ्या संपूर्ण तपशील
किवी संघासाठी सध्या ग्लेन फिलिप्स 58 चेंडूत 41 धावा करून नाबाद असून टीम साऊथी 19 चेंडूत 10 धावा करून नाबाद आहे.
New Zealand National Cricket Team vs England National Cricket Team: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटी सामना क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे खेळवला जात आहे. शुक्रवारी, 29 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 वाजता दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवसअखेर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 83 षटकांत 8 गडी गमावून 319 धावा केल्या आहेत. किवी संघासाठी सध्या ग्लेन फिलिप्स 58 चेंडूत 41 धावा करून नाबाद असून टीम साऊथी 19 चेंडूत 10 धावा करून नाबाद आहे. याशिवाय केन विल्यमसन 197 चेंडूत 93 धावा करून बाद झाला आणि त्याचे शतक हुकले. टॉम लॅथमने 47, रचिन रवींद्रने 34 धावा, डेव्हन कॉनवेने 2 धावा, डॅरिल मिशेलने 19 धावा, टॉम ब्लंडेलने 17 धावा आणि मॅट हेन्रीने 18 धावा केल्या.
शोएब बशीरने केली शानदार गोलंदाजी
इंग्लंडच्या पहिल्या डावात शोएब बशीरने आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. शोएब बशीरने 20 षटकात 69 धावा देत 4 बळी घेतले आहेत. याशिवाय ब्रेडेन कार्स आणि गस ऍटकिन्सन यांना 2 बळी मिळाले आहेत. सध्या हा सामना खूपच रोमांचक झाला आहे. दोन्ही संघांसाठी दुसरा दिवस खूप महत्त्वाचा आहे. (हे देखील वाचा: New Zealand vs England 1st Test 2024 Day 2 Live Streaming: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला कधी होणार सुरुवात? भारतात थेट सामन्याचा कधी अन् कुठे घेणार आनंद? येथे जाणून संपूर्ण तपशील)
हेड टू हेड रेकाॅर्ड
न्यूझीलंड आणि इंग्लंड 112 कसोटी सामने आमनेसामने आले आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडने 112 पैकी 52 कसोटी सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 13 सामने जिंकले आहेत. याशिवाय 47 सामने अनिर्णित राहिले आहेत. यावरून इंग्लंडचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येते.
खेळपट्टीचा अहवाल
क्राइस्टचर्चच्या मागील रेकॉर्डनुसार या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांना फायदा झाला आहे. पहिल्या दिवशी खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना मदत केली, पण जसजसा सामना पुढे जाईल तसतसे ते सोपे होईल. या काळात फलंदाजी करणे सोपे झाले. पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी फिरकीपटूही महत्त्वाची भूमिका बजावतील. चौथ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करणे संघासाठी सोपे होऊ शकते, कारण येथे धावांचा पाठलाग करताना 13 पैकी 7 सामने जिंकले आहेत.
पहिल्या कसोटी सामन्यातील प्रमुख खेळाडू (Key Players): ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, टिम साउथी, मॅट हेन्री, विल्यम ओ'रुर्के, जेराल्ड कोएत्झी, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ओली पोप, बेन स्टोक्स, हे असे काही खेळाडू आहेत ज्यांना सामन्याचा मार्ग कसा बदलायचा हे माहित आहे.
मिनी बॅटलमध्ये एकमेकांना अडचणीत आणणारे खेळाडू (Mini Battle): इंग्लंडच्या जो रूट आणि विल्यम ओ'रोर्क यांच्यातील संघर्ष रोमांचक असू शकतो. मात्र, दोन्ही संघांची फलंदाजी मजबूत आहे. जे गोलंदाजांसाठी मोठे आव्हान असेल. याशिवाय दोन्ही संघांची फळी संतुलित आहे.
कुठे पाहणार लाइव्ह स्टीमिंग?
आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या भारतात टीव्हीवर न्यूझीलंड आणि इंग्लंड कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण करण्याबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाचा आनंद घेता येईल.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, टिम साउथी, मॅट हेन्री, विल्यम ओ'रुर्के.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), बेन स्टोक्स (कर्णधार), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर.