England vs Australia 3rd T20I Key Players: आजच्या अंतिम सामन्यात 'हे' खेळाडू करु शकतात कहर, एकहाती फिरवु शकतात सामना

यासह इंग्लंडने मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेवर कब्जा करण्यासाठी रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे.

ENG vs AUS (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team 3rd T20I 2024: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील 2024 मधील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना आज खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. (हे देखील वाचा: England vs Australia 3rd T20 2024 Preview: मालिकेवर कब्जा करण्यासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उतरणार मैदानात, स्ट्रीमिंगसह संपूर्ण तपशील घ्या जाणून)

दोन्ही संघात होणार रोमांचक सामना

दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा तीन विकेट्स राखून पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेवर कब्जा करण्यासाठी रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे. या मालिकेत इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी फिट सॉल्ट सांभाळत आहे. तर ऑस्ट्रेलियाची कमान मिचेल मार्शच्या खांद्यावर आहे.

'या' खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांचे लक्ष 

ट्रॅव्हिस हेड : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात तुफानी खेळी केली. ट्रॅव्हिस हेडने 256.52 च्या स्ट्राईक रेटने 23 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 59 धावांची सर्वोच्च खेळी केली.

आदिल रशीद : इंग्लंडचा अनुभवी लेगस्पिनर आदिल रशीदने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सर्वाधिक त्रास दिला आहे. आदिल रशीदने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 25.92 च्या सरासरीने 14 विकेट घेतल्या आहेत. आजच्या रोमांचक सामन्यातही इंग्लंड संघाला आदिल रशीदकडून मोठ्या अपेक्षा असतील.

मिचेल मार्श : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श आजच्या सामन्यात कहर करू शकतो. इंग्लंडविरुद्ध मिचेल मार्श चांगली फलंदाजी करतो. मिचेल मार्शने इंग्लंडविरुद्ध 7 टी-20 आंतरराष्ट्रीय डावात 33.60 च्या सरासरीने आणि 129.23 च्या स्ट्राइक रेटने 170 धावा केल्या आहेत.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11 

इंग्लंड : फिलिप सॉल्ट (कर्णधार आणि विकेटकीपर), विल जॅक, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम कुरन, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, साकिब महमूद, रीस टोपली.

ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, आरोन हार्डी, कूपर कोनोली, शॉन ॲबॉट, ॲडम झम्पा.