England vs Australia 1st ODI Head to Head Records: पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार चुरशीची लढत, आकडेवारीत कोण आहे सरस? घ्या जाणून

जोस बटलरच्या अनुपस्थितीत इंग्लंड संघाची कमान हॅरी ब्रूककडे आहे. मिशेल मार्श ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळत आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल.

ENG vs AUS (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team: कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपल्यानंतर, नॉटिंगहॅममध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत इंग्लंड संघाची कमान हॅरी ब्रूककडे आहे. मिशेल मार्श ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळत आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. तर टॉसची वेळ अर्धा तास आधी असेल. (हे देखील वाचा: England vs Australia 1st ODI Weather Report: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? जाणून घ्या नॉटिंगहॅममध्ये कसे असेल हवामान)

आकडेवारीत कोण आहे सरस? (ENG vs AUS Head to Head)

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया वनडेमध्ये आतापर्यंत 156 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये इंग्लंडने 63 तर ऑस्ट्रेलियाने 88 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने निकालाशिवाय संपले. इंग्लंडने घरच्या भूमीवर 63 पैकी 36 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये 88 पैकी 33 सामने जिंकता आले आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, तगड्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे इंग्लंड संघात अनुभवाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

इंग्लंड एकदिवसीय संघ

हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (विकेट-कीपर), बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ऑली स्टोन, रीस टोपली, जॉन टर्नर

ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ

मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), कूपर कोनोली, बेन द्वारशिस, कॅमेरॉन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा