England Playing 11 For 2nd Test Against Pakistan 2024: दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11 जाहीर, कर्णधार बेन स्टोक्स आणि मॅट पॉट्सची वापसी

या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पहिल्या 149 षटकात 556 धावांवर सर्वबाद झाला होता.

ENG Team (Photo Credit - X)

Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 2nd Test 2024 Live Streaming:   पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपली प्लेइंग 11 जाहीर केली आहे. कर्णधार बेन स्टोक्स इंग्लंडच्या प्लेइंग 11 मध्ये परतला आहे. जो श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जखमी झाला होता. मात्र, आता तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे.  (हेही वाचा  -  Joe Root New Record: पाकिस्तानविरुद्ध जो रूटने ठोकले द्विशतक, कसोटीत सचिन-सेहवागची केली बरोबरी )

याशिवाय डरहमचा वेगवान गोलंदाज मॅट पॉट्सचा ऑगस्टच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीनंतर प्रथमच प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन आणि ख्रिस वोक्स यांना विश्रांती देण्यात आली आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि 47 धावांनी विजय मिळवला होता. या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पहिल्या 149 षटकात 556 धावांवर सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने 150 षटकांत 7 बाद 823 धावा करत पहिला डाव घोषित केला आणि 267 धावांची आघाडीही मिळवली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 317 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात यजमान संघ दुसऱ्या डावात 220 धावांत गारद झाला आणि इंग्लंडने विजय मिळवला. यासह पाहुण्या संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11:

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर