England vs Australia 3rd T20 2024 Preview: मालिकेवर कब्जा करण्यासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उतरणार मैदानात, स्ट्रीमिंगसह संपूर्ण तपशील घ्या जाणून

यासह इंग्लंडने मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेवर कब्जा करण्यासाठी रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे.

ENG vs AUS (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team 3rd T20I 2024: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील 2024 मधील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना आज खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. (हे देखील वाचा: England vs Australia 2nd T20I Highlights: इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून केला पराभव, मालिकेत साधली 1-1 अशी बरोबरी; येथे पाहा सामन्याचे हायलाइट)

दोन्ही संघात होणार रोमांचक सामना

दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा तीन विकेट्स राखून पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेवर कब्जा करण्यासाठी रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे. या मालिकेत इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी फिट सॉल्ट सांभाळत आहे. तर ऑस्ट्रेलियाची कमान मिचेल मार्शच्या खांद्यावर आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धा बरोबरीची होती. दोन्ही संघांमध्ये एकूण 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने 12 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडनेही 12 सामने जिंकले आहेत. दरम्यान, 2 सामनेही अनिर्णित राहिले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 10 टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. या कालावधीत इंग्लंडने 5 मालिका जिंकल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 2 जिंकल्या आहेत. याशिवाय 3 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

'हे' खेळाडू करु शकतात कहर

फिल सॉल्ट, सॅम कुरन, ट्रॅव्हिस हेड, मार्कस स्टॉइनिस, जोफ्रा आर्चर, कॅमेरॉन ग्रीन, हे असे काही खेळाडू आहेत ज्यांना सामन्याचा मार्ग कसा बदलायचा हे माहित आहे, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

मिनी बॅटलमध्ये एकमेकांना अडचणीत आणणारे खेळाडू 

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि आदिल रशीद यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. त्याचवेळी फिल सॉल्ट आणि ॲरॉन हार्डी यांच्यातील संघर्षाचाही या सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. दोन्ही संघांमध्ये अनेक प्रभावी युवा खेळाडूंसह संतुलित फळी आहे.

कधी अन् कुठे पाहणार सामना?

आम्ही तुम्हाला सांगतो की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना भारतातील टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे सोनी स्पोर्ट्स टेन 5 एसडी आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, SonyLIV आणि FanCode ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11 

इंग्लंड : फिलिप सॉल्ट (कर्णधार आणि विकेटकीपर), विल जॅक, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम कुरन, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, साकिब महमूद, रीस टोपली.

ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, आरोन हार्डी, कूपर कोनोली, शॉन ॲबॉट, ॲडम झम्पा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif