पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम आयपीएल खेळणार? इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
तसेच बाबर हा युवा खेळाडू आहे, तो हुशार आहे. विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्थिम, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि इंग्लंचा कर्णधार जॉय रुट यांच्याबाबतीत नेहमी बोलले जाते. ते फॅब फाईव्ह आहेत. आता बाबर आझमचाही यात समावेश झाला आहे, असेही ते म्हणाले होते.
पाकिस्तान किक्रेट संघाचा खेळाडू बाबर आझम (Babar Azam) हा गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे. त्याने सर्वोकृष्ट कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव प्रस्थापित केले आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत बाबर आझमने आतापर्यंत चांगली खेळी करून दाखवली आहे. यातच भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रिमीअर लीगमध्ये (IPL) बाबर आझामला खेळण्याची गरज आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन (Nasser Hussain) व्यक्त केले आहे. नासिर यांच्या वक्तव्यानंतर बाबर आझाम आयपीएल खेळणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
“मला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकारणात पडायचे नाही. पण हे दोन्ही देश एकमेकांशी खेळत नाही म्हणजे प्रिमीअर लिग स्पर्धेत मँचेस्टर सिटी मँचेस्टर युनायटेड सोबत खेळत नाही असे वाटते. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते, परंतू यानंतर बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे पाकिस्तानी खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला. पण माझ्यामते बाबर आझम सारख्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची गरज आहे", असे नासिर हुसैन एका खाजगी कार्यक्रमात बोलत होते. हे देखील वाचा- IPL 2020 Update: आयपीएल 13 च्या पहिल्या आढवड्याला मुकणार इंग्लंड-ऑस्ट्रेलियन खेळाडू; पाहा कोणत्या संघाला बसला सर्वाधिक फटका
याआधीही नासिर यांनी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बाबर आझमची तुलना केली होती. तसेच बाबर हा युवा खेळाडू आहे, तो हुशार आहे. विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्थिम, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि इंग्लंचा कर्णधार जॉय रुट यांच्याबाबतीत नेहमी बोलले जाते. ते फॅब फाईव्ह आहेत. आता बाबर आझमचाही यात समावेश झाला आहे, असेही ते म्हणाले होते.