MS Dhoni Knee Treatment: धोनीच्या गुडघ्यावर आज मुंबईत होऊ शकते शस्त्रक्रिया; माहीने घेतली ऋषभ पंतची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची भेट
आता त्याच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया होऊ शकते. धोनीने डॉ दिनशॉ परडीवाला यांची भेट घेतली आहे.
MS Dhoni Knee Treatment: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) च्या गुडघ्यावर आज शस्त्रक्रिया (Surgery) होऊ शकते. आयपीएलच्या 16 व्या हंगामात तो गुडघ्याच्या समस्येशी झुंजताना दिसला होता. आयपीएल जिंकल्यानंतर 48 तासांच्या आत त्याने मुंबईतील डॉक्टरांचा सल्ला घेतला. धोनीने त्याच डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे ज्यांनी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर उपचार केले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी बुधवारी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्या गुडघ्यावर उपचार घेण्यासाठी आला होता. आता त्याच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया होऊ शकते. धोनीने डॉ दिनशॉ परडीवाला यांची भेट घेतली आहे. दिनशॉ हे स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक्सचे तज्ज्ञ तसेच हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स मेडिसिनचे संचालक आहेत. ते दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंतवरही उपचार करत आहे. (हेही वाचा - New Team India Jersey: आदिदासने भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन Jersey ची झलक केली पोस्ट, खेळाडूंनी केली प्रसंसा)
मुंबईला जाण्यापूर्वी धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा केली. फ्रँचायझीने त्यांचे टीम फिजिशियन डॉ मधु थोट्टापिली यांना धोनीसोबत मुंबईला पाठवले आहे. याआधी बुधवारी चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली होती.
आयपीएलदरम्यान धोनी डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त दिसला होता. तो प्रत्येक सामन्यात खास पट्टी बांधून मैदानात उतरत असे. धोनीने आयपीएल दरम्यान खालच्या क्रमाने फलंदाजी केली. त्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितलं की, तो जास्त धावू शकत नाही.