India Tour of Sri Lanka: आयपीएल 2021 च्या ‘या’ 3 राइजिंग स्टार्सना श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात मिळू शकते संधी
टीम इंडियामध्ये अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे आगामी मालिकेत आयपीएलमधील काही प्रतिभावान खेळाडूंना त्यांची पहिली टीम इंडिया कॅप मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
India Tour of Sri Lanka 2021: इंग्लंड (England) दौऱ्यावर कसोटी मालिका सुरु असताना टीम इंडियाचा (Team India) आणखी एक समान महत्त्वपूर्ण व्हाइट बॉल संघ द्विपक्षीय वनडे आंतरराष्ट्रीय आणि टी-20 मालिकेसाठी श्रीलंका (Sri Lanka) दौर्यावर जाणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत संघ दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामने आणि तितकेच टी-20 सामने खेळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर श्रीलंकाविरुद्ध मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक मोसमाप्रमाणेच क्रिकेटमधील सर्वात मोठ्या लीगने अनेक प्रतिभावान युवा खेळाडूंसाठी भारतीय संघात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. टीम इंडियामध्ये अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे आगामी मालिकेत आयपीएलमधील (IPL) काही प्रतिभावान खेळाडूंना त्यांची पहिली टीम इंडिया कॅप मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकतील अशा आयपीएल 2021 मधील स्टार युवा खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहे. (India Tour Of Sri Lanka 2021: श्रीलंका दौऱ्यावर भारताच्या कर्णधारपदासाठी ‘हे’ 3 स्टार खेळाडू असतील प्रमुख दावेदार, कोण मारणार बाजी?)
राहुल तेवतिया (Rahul Tewatia)
गोलंदाजी अष्टपैलू रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू राहुल तेवतियाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. तेवतियाला यापूर्वी इंग्लंडच्या भारत दौऱ्यादरम्यान भारतीय संघात स्थान मिळाले होते पण प्लेइंग XI मध्ये त्याला संधी मिळाली नाही. आयपीएल 2021 मध्ये अष्टपैलू खेळाडूने 86 धावा केल्या आणि 2 विकेट्सही घेतल्या.
देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal)
आयपीएल 2021 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सलामी फलंदाजाने भारतीय घरगुती सर्किटवर धावांचा डोंगर उभारत प्रभावी कामगिरी बजावली होती. आयपीएलमधील पहिल्यांदा शतकी खेळी करत पडिक्क्लने कर्णधार विराट कोहली सोबत सर्वात मोठी सलामी भागीदारी केली. आयपीएल स्थानगीत होईपर्यंत पडिक्क्लने आरसीबीकडून 6 सामने 195 धावा काढल्या आहेत.
हर्षल पटेल (Harshal Patel)
डेथ-ओव्हर स्पेशलिस्टने आपल्या गोलंदाजीने सर्वांना चकित केले. या हंगामात आरसीबीसाठीच्या पहिल्या सामन्यात पटेलने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत इतिहास रचला. आरसीबीच्या या वेगवान गोलंदाजाने सात सामन्यात 17 विकेट्स घेतल्या व यंदाच्या आयपीएलमधील पर्पल कॅप काबीज केली. यावर्षी पटेल भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मुख्य दावेदार मानला जात आहे.