Delhi Beat Bengaluru, TATA IPL 2025: दिल्लीने बंगळुरूचा 6 विकेट्सने केला पराभव, राहुलच्या स्फोटक खेळीने जिंकला सामना
दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला. त्याआधी, दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळूरुने दिल्लीसमोर 164 धावांचे लक्षेय ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीने 17.5 षटकात 4 गडी 169 धावा करत लक्ष गाठले.
Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals, TATA IPL 2025 24th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 24 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यात च्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium, Bengaluru) खेळवला गेला. या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला. त्याआधी, दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळूरुने दिल्लीसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीने 17.5 षटकात 4 गडी 169 धावा करत लक्ष गाठले.
Match 24. Delhi Capitals Won by 6 Wicket(s) https://t.co/h5Vb7sp2Z6 #RCBvDC #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2025
टिम डेव्हिडची 37 धावांची स्फोटक खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळूरुने 20 षटकात 7 गडी गमावून 163 धावा केल्या. बंगळूरुकडून टिम डेव्हिडने 37 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने 20 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्याशिवाय फिलिप सॉल्ट 37 आणि रजत पाटीदारने 25 धावांचे योगदान दिले. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून गोलंदाजीत विपल निगम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. (हे देखील वाचा: Virat Kohli Milestone: कोहलीने इतिहास रचला, 1000 चौकारांचा टप्पा गाठला, असा पराक्रम करणारा ठरला पहिला आयपीएल खेळाडू)
केएल राहुलची 93 धावांची नाबाद खेळी
त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने 17.5 षटकांत फक्त चार गडी गमावून लक्ष्य गाठले. दिल्ली कॅपिटल्सकडून स्टार फलंदाज केएल राहुलने 93 धावांची नाबाद खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, केएल राहुलने 53 चेंडूत सात चौकार आणि सहा षटकार मारले. केएल राहुल व्यतिरिक्त, ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 38 धावा केल्या. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार व्यतिरिक्त यश दयाल आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

