DC Vs SRH, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

भारतीय वेळेनुसार, आज 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

DC Vs SRH, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
Delhi Capitals Vs Sunrisers Hyderabad (Photo Credit: IPL)

इंडियन प्रीमिअर लीग 2020च्या (Indian Premier League 2020) अकराव्या सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. दरम्यान, संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना शेख जायद स्टेडियमवर पार पडणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीच्या संघाने दोन्ही सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत.तर, स्पर्धेतील आपले पहिले दोन्ही सामने गमावल्याने सनरायझर्स हैदराबादला अजून गुणतालिकेमध्ये भोपळाही फोडता न आल्याने ते तळाशी आहेत. यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवणे महत्वाचे ठरणार आहे.

भारतीय वेळेनुसार, आज 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. हे देखील वाचा- How to Download Hotstar To Watch DC Vs SRH Live: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा

दिल्ली कॅपिटल्स:

श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमीयर, कागिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, रिषभ पंत (विकेटकिपर), इशांत शर्मा, एक्झर पटेल, संदीप लामिछाने, केमो पॉल, डॅनियल सॅम , मोहित शर्मा, अनरिच नॉर्टजे, ऍलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोईनिस, ललित यादव

सनरायझर्स हैदराबाद: 

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराटसिंग, प्रियांम गर्ग, वृध्दिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बावनका संदीप , संजय यादव, फॅबियन लेन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन, बासिल थंपी

(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2020 07:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).