SRH vs DC IPL 2025 55th Match Live Scorecard: पॅट कमिन्ससमोर दिल्लीने गुडघे टेकले, हैदराबादला मिळाले फक्त 134 धावांचे लक्ष्य
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ तिसऱ्या पराभवाचा धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, हैदराबादने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीने हैदराबादसमोर 134 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
SRH vs DC IPL 2025 55th Match: आयपीएल 2025 चा 55 वा (IPL 2025) सामना 5 मे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (SRH vs DC) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पॅट कमिन्स आणि कंपनीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ तिसऱ्या पराभवाचा धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, हैदराबादने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीने हैदराबादसमोर 134 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आशुतोष शर्माची 41 धावांची जलद खेळी
प्रथम फलंदाजी करताना पंजाब दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 133 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून स्फोटक फलंदाज आशुतोष शर्माने 41 धावांची जलद खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 26 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार मारले. अशुतोष शर्मा व्यतिरिक्त ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 41 धावांचे योगदान दिले.
पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट
दुसरीकडे, कर्णधार पॅट कमिन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तसेच जयदेव उनाडकट, हर्षल पटेल आणि एशान मलिंगा प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकांत 134 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2025 09:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

