Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेवर David Warner ने व्यक्त केले दु:ख, भविष्यात Air India ने प्रवास न करण्याचा घेतला निर्णय
अहमदाबाद विमान अपघातानंतर डेव्हिड वॉर्नरने एक मोठा निर्णय घेतला आहे. निर्णय घेण्यापूर्वी त्याने संपूर्ण घटना दुःखद आणि वेदनादायक असल्याचेही सांगितले.
Ahmedabad Plane Crash: डेव्हिड वॉर्नरचे भारतावरील प्रेम हे जगजाहीर आहे. पण नुकत्याच झालेल्या अहमदाबाद दुर्घटनेनंतर त्याचे भारतावरील प्रेम डगमगले की काय असा प्रश्न उभार राहिला आहे. आता तो कदाचित कधीच एअर इंडियाने प्रवास करू शकणार नाही असे दिसते. प्रत्यक्षात, अहमदाबाद विमान अपघातानंतर डेव्हिड वॉर्नर (David Warner)ने स्वतःहून निर्णय घेतला आहे की तो पुन्हा कधीही एअर इंडियाने प्रवास (Air India Plane Crash) करणार नाही. 12 जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान टेकऑफ करताच कोसळले. त्यात 265 प्रवाशांचा मृत्यू झाला. डेव्हिड वॉर्नरने स्वतः च्या इन्स्टा स्टोरीमध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे.
डेव्हिड वॉर्नरचा मोठा निर्णय
ऑस्ट्रेलियाच्या माजी सलामीवीर राहीलेला वॉर्नर याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अहमदाबाद विमान अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने संपूर्ण घटनेचे दुःखद वर्णन केले. नंतर त्याने सांगितले की तो संपूर्ण कुटुंबासोबत एअर इंडियाने प्रवास करण्याचा विचार करत होता. पण आता नाही. तो म्हणाला की तो पुन्हा कधीही एअर इंडियाने प्रवास करणार नाही.
डेव्हिड वॉर्नरच्या या विधानामागील कारण म्हणजे एअर इंडियाच्या माजी क्रू मेंबरने केलेले आरोप, ज्यामध्ये त्यांनी दोषपूर्ण विमानांच्या सततच्या प्रयोगांचा उल्लेख केला. अशा प्रकारे निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळून नफा कमवणे खूप लज्जास्पद आहे. असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.
Instagram story Of David Warner For Air India #planecrash #AhmedabadPlaneCrash #Ahmedabad #DavidWarner pic.twitter.com/d1j3aUcMLE
— TusH (@TushS07) June 13, 2025
डेव्हिड वॉर्नरची कारकीर्द
डेव्हिड वॉर्नर 15 वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळला आहे. या काळात त्याने 112 एकदिवसीय, 162 कसोटी आणि 110 टी-20 सामने खेळले आहेत. डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या तिन्ही स्वरूपात 18000 हून अधिक धावा केल्या आहेत. या ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 49 शतके आहेत, त्यापैकी सर्वाधिक 26 कसोटीत, 22 एकदिवसीय सामन्यात तर 1 शतक टी-20 मध्ये आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 10:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

