डेमियन मार्टिन ने अलीम डार यांच्या अंपायरिंगवर साधला निशाणा, 2005 च्या अ‍ॅशेसच्या एलबीडब्ल्यू निर्णयाचा 'सर्वात वाईट' म्हणून केली टीका

ट्विटर यूजरने 2005 च्या अ‍ॅशेस मालिकेदरम्यान अलीम डार यांच्या चुकीच्या निर्णयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये डार यांच्या चुकीच्या निर्णयामुळे सायमन कॅटिच यांना आऊट देण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि कॅटिचचे माजी सहकारी डेमियन मार्टिनने हा व्हिडिओ पहिला तेव्हा त्याने चुकीच्या निर्णयाबद्दल डारला फटकारले आणि या निर्णयाला सर्वात वाईट म्हणून घोषित केले.

डेमियन मार्टिन ने अलीम डार यांच्या अंपायरिंगवर साधला निशाणा (Photo Credits: Getty Images)

कोविड-19 मुळे जगभरातील क्रीडाविषयक स्पर्धा ठप्प झाल्या असल्याने क्रीडापटू सोशल मीडियावर बरेच सक्रिय झाले आहेत आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील क्रिया त्यांच्या चाहत्यांसह शेअर करीत आहेत. अलीकडेच, ट्विटर यूजरने 2005 च्या अ‍ॅशेस (Ashes) मालिकेदरम्यान अलीम डार यांच्या चुकीच्या निर्णयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये डार यांच्या चुकीच्या निर्णयामुळे सायमन कॅटिच (Simon Katich) यांना आऊट देण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि कॅटिचचे माजी सहकारी डेमियन मार्टिनने (Damien Martyn) हा व्हिडिओ पहिला तेव्हा त्याने चुकीच्या निर्णयाबद्दल डारला फटकारले आणि या निर्णयाला सर्वात वाईट म्हणून घोषित केले. “इतिहासामधील सर्वात वाईट अम्पायरिंग. जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा विश्वास ठेवणे कठीण,’’ मार्टिनने व्हिडिओ रिट्विट करताना लिहिले. (IPL 2020 पूर्वी CSK सराव सत्रात एमएस धोनी, सुरेश रैना यांनी ठोकले षटकार, चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला Unseen व्हिडिओ)

व्हिडिओमध्ये स्टीव हैरिसनचा चेंडू कॅटिचच्या पॅडला लागला. गोलंदाजाने एलबीडब्ल्यूसाठी अपील केले आणि डार यांनी जास्त वेळ न घेता कॅटिच यांना आऊट दिले. मात्र, रिप्लेमध्ये स्पष्ट झाले की चेंडू चेंडू पॅडच्या बाहेरच्या बाजूला लागला आणि चेंडू स्टंप्सवरील लागत नव्हता. पाहा हा व्हिडिओ:

2005 इंग्लंडमधील अ‍ॅशेस मालिकेने विविध कारणांमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आणि अम्पायरिंगमधील त्रुटी त्यापैकी एक होती. 67 कसोटी, 208 एकदिवसीय आणि 4 टी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारा मार्टिनही त्या मालिकेत सहभागी होता. अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे मार्टिनही दोनवेळा बाद झाला. माइकल वॉनच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने चुरशीच्या लढतीतील मालिका 2-1 ने जिंकली. 2005 मध्ये मार्टिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि नंतर भाष्यकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अलीकडेच माजी ऑस्ट्रेलियाच्या स्टारने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीबरोबरचा एक जुना फोटो शेअर करत त्याला ‘चॅम्पियन’ म्हटले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now