CSK ने शेअर केला 'थाला' एमएस धोनीचा नवीन व्हिडिओ, 'आया शेर आया शेर' म्हणत Netizens ने केले स्वागत
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) मंगळवारी आपला कर्णधार महेंद्र धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चेन्नईने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 'थाला' धोनी दरवाज्यातून बाहेर येत आहे. चेन्नईने 'द स्वीट किंग' च्या कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मंगळवारी आपला कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. परिस्थिती सामान्य राहिली असती तर धोनी यावेळी आयपीएल 13 मध्ये चेन्नईचा कर्णधार असता पण कोविड-19 (COVID-19) मुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी -20 वर्ल्ड कपच्या आयोजनावरही संकट बनले आहे. धोनीने मागील वर्षी वर्ल्ड कप सेमीफायनलनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्याचे चाहते क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये चेन्नई सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. अशा परिस्थितीत आम्ही बर्याच वेळा पाहिले आहे की चेन्नई सतत व्हिडिओ पोस्ट करत आहे जेणेकरून चाहत्यांनाही त्यांच्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहायला मिळेल. (कोरोना लॉकडाउन काळात जिवा धोनी बनली डेअरडेव्हिल, जुनिअर धोनीच्या स्टाईलने नेटिझन्स इम्प्रेस)
चेन्नईने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 'थाला' धोनी दरवाज्यातून बाहेर येत आहे. त्याच्यासोबत चिन्ना थाला म्हणजेच सुरेश रैना देखील आहेत. या व्हिडिओमध्ये चाहते धोनीच्या नावाचे नारे लावताना दिसत आहेत. दरवाजातून बाहेर पडताना धोनीने सुरक्षारक्षकाच्या सलामीला प्रथम उत्तर दिले आणि नंतर बसमध्ये जाताना आपल्या चाहत्यांकडे हातात द्राक्षे दाखवतो. चेन्नईने 'द स्वीट किंग' च्या कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला. पाहा हा व्हिडिओ:
चाहत्यांनी धोनीच्या व्हिडिओवर भरभरून प्रतिसाद दिला:
माहीला पसंत करण्याचे 101 कारण
एमएसडीला पपई आणि द्राक्षे खायला आवडते
अप्रतिम
आया शेर आया शेर
धोनी
धोनी आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे त्याचे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन लांबणीवर गेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढत असल्याने आयपीएल पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)