CSK Playoff Chances: चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडे अजूनही प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी? वाचा सविस्तर

युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 38 सामने पूर्ण झाले आहेत. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सर्वांना आकर्षित केले आहे.

CSK (Photo Credit: IPL)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रिमिअर लीग (India Premier League 2020) यंदा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 38 सामने पूर्ण झाले आहेत. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. मात्र, आयपीएलच्या प्रत्येक हंगामात सर्वोकृष्ट कामगिरी करणारा चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) संघ यावर्षी गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. या हंगामात चेन्नईच्या संघाने 10 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 7 सामन्यात पराभूत झाला आहेत. मात्र, या हंगामात चेन्नईच्या संघाला अजूनही प्ले- ऑफमध्ये स्थान मिळवता येणार आहे. यासाठी उरलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाला दमदार कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.

चेन्नईचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. तसेच चेन्नईच्या संघाला आणखी 4 सामने खेळायचे आहेत. यामुळे येत्या पुढील चारही सामन्यात चेन्नईच्या संघाने विजय मिळवला तर, त्याचे 14 गुण होतील. महत्वाचे म्हणजे, प्ले- ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाकडे 16 गुण असणे गरजेचे असते. परंतु, सरासरीच्या जोरावर याआधी अनेक संघांनी 14 गुणांसह देखील प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. याशिवाय सलग चार सामन्यात विजय मिळवल्याने चेन्नईच्या सरासरीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- Dwayne Bravo Ruled Out of IPL 2020: चेन्नई सुपर किंग्जच्या अडचणीत आणखी भर; दुखापतीमुळे ड्वेन ब्राव्हो आयपीएलमधून बाहेर

आयपीएल गुणतालिका-

आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. तर 12 गुणांसह मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असून त्यांचे देखील 10 गुण आहेत पण सरासरी -0.096 इतकी आहे. यामुळे यंदाचा आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्ली यांनी प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केली आहे. सध्या कोलकाता नाईट राईडर्स 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयलचा संघ 8 गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे. पंजाबच्या तुलनेत सरासरी रेट कमी असल्यामुळे राजस्थानचा संघ सहाव्या स्थानी आहे. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ सातव्या तर, चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.