Rinku Singh and Priya Saroj Wedding: क्रिकेटपटू रिंकू सिंग खासदार प्रिया सरोजसोबत लवकरच अडकणार लग्नबंधनात; 'या' तारखेला पार पडणार लग्नसोहळा
क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. याशिवाय, साखरपुड्याची तारीखही समोर आली आहे. साखरपुडा 8 जून रोजी लखनऊमध्ये होणार आहे. लग्न वाराणसीमध्ये होणार आहे.
Rinku-Priya Wedding: क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज (Rinku Singh Wedding MP Priya Saroj)हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. याशिवाय, साखरपुड्याची तारीखही समोर आली आहे. दोघांचा साखरपुडा 8 जून रोजी लखनऊमध्ये होणार आहे. लग्न वाराणसीमध्ये होणार आहे. प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. 18 नोव्हेंबर 2025 रोजी वाराणसीतील हॉटेल ताज येथे हा विवाह होणार आहे. त्यात क्रिकेट स्टार, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती आणि उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता.
साखरपुडा आणि लग्नाची तारीख निश्चित
पारंपारिक पद्धतीनुसार लग्नसोहळा पार पडणार आहे. साखरपुडा 8 जून रोजी लखनऊमध्ये होणार आहे. लग्न वाराणसीमध्ये होणार आहे. तर लग्न समारंभ 18 नोव्हेंबर 2025 रोजी वाराणसीतील हॉटेल ताज येथे होणार आहे.
प्रिया सरोज व्यवसायाने वकील
लग्नसोहळ्यात देशभरातील प्रमुख राजकारणी, क्रिकेटपटू, चित्रपट तारे आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते. दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ घेतला. प्रिया सरोज व्यवसायाने वकील आहेत. प्रिया आणि रिंकू एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात.
2024 च्या सुरुवातीला आठ कोटी मालमत्ता
रिंकू सिंगला 2017 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने पहिल्यांदा 10 लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 80 लाख रुपयांना त्यांच्या संघात समाविष्ट केले. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात केकेआरने त्याला 13 कोटी रुपयांना कायम ठेवले.
वार्षिक उत्पन्न सुमारे 60 ते 80 लाख रुपये
रिंकू सिंगचे वार्षिक उत्पन्न सुमारे 60 ते 80 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. 2024 मध्ये रिंकू सिंगची एकूण मालमत्ता सुमारे 8 कोटी रुपये असल्याचा अंदाज होता. ज्यामध्ये गेल्या वर्षी चांगली वाढ झाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

