Coronavirus: करोनाविषयी सोशल मीडियावर चुकीची माहिती शेअर केल्याबद्दल फुटबॉलपटू Dele Alli वर एका सामन्याची बंदी, भरावा लागणार 50 हजार पाऊंडाचा दंड

सोशल मीडियावर करोना व्हायरससंदर्भात वर्णद्वेषी पोस्ट शेअर केल्याबद्दल अलीवर ही कारवाई करण्यात आली आहे. अलीने आपल्या स्नॅपचॅट कन्वर्सेशनमध्ये करोना आणि आशियाई व्यक्तींबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

इंग्लंड फुटबॉलर डेले अली (Photo Credit: Getty)

इंग्लिश प्रिमीअर लिगच्या टोटॅनहम (Tottenham) फुटबॉल क्लबचा खेळाडू डेले अ‍लीवर (Dele Alli) एका सामन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर करोना व्हायरससंदर्भात (Coronavirus) वर्णद्वेषी पोस्ट शेअर केल्याबद्दल अलीवर ही कारवाई करण्यात आली आहे. अलीने आपल्या स्नॅपचॅट कन्वर्सेशनमध्ये करोना आणि आशियाई व्यक्तींबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या संभाषणाचे स्क्रिनशॉट ब्रिटनमधील एका वृत्तपत्राकडे गेल्यानंतर अलीवर कारवाई करण्यात आली आहे. फुटबॉल असोसिएशनने (Football Association) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. फुटबॉल असोसिएशनने सांगितले की अलीची कृती हा विनोदाचा चुकीचा प्रयत्न आहे परंतु खेळाडूने “अपमानास्पद किंवा वांशिक चालीरीती तयार केली नाही.” हा खेळ बदनाम करण्यासाठी अलि दोषी ठरला, शर्यतीचा संदर्भ घेऊन हा “तीव्र उल्लंघन” बनला आहे असे एफएने म्हटले. 19 जूनला इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला मॅनचेस्टर युनायटेड आणि टोटेनहॅममधील सामन्याला मुकावे लागणार आहे. (Coronavirus: कोट्याधीश फुटबॉलर नेमार याने ब्राझील सरकारकडून कोरोना व्हायरस वेलफेर पेमेंट योजनेंतर्गत मदतीसाठी केला अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रकार)

याव्यतिरीक्त डेलेला 50 हजार पाऊंडचा दंडही भरावा लागणार आहे. डेलेने हा प्रकार जाणूनबुजून केलेला नसला तरीही यामधून समाजातील एका गटाचा अपमान होईल असं वक्तव्य असल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचं फुटबॉल असोसिएशनने स्पष्ट केलं. दरम्यान, फुटबॉल संघटनेचा निर्णय आल्यानंतर डेलेने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे आणि आपल्या वागण्यामुळे क्लबची मान शरमेने खाली गेली याबद्दल मला खेद असल्याचं डॅलीने म्हटलं. आपण केलेल्या कृत्याचं समर्थन करता येणं शक्य नसल्याचंही डेलेने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं.

दुसरीकडे, कोरोनामुळे फटका बसणार ब्रिटन हा जगातील दुसरा देश आहे. आजवर कोरोनामुळे अमेरिकानांतर ब्रिटनमध्ये 41,000 हुन अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.