IPL 2020 रद्द करण्याबाबत बीसीसीआय आणि फ्रेंचायझींमध्ये मंगळवारी होणार बैठक, अंतिम निर्णय येण्याची शक्यता

एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएल फ्रँचायझी यांच्यात मंगळवार, 24 मार्च रोजी कॉन्फरन्स कॉलद्वारे बैठक होईल, जिथे आयपीएलच्या 13 व्या सत्रात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

कोविड-19 (COVID-19_ मुळे जगातील जवळपास सर्व क्रीडा स्पर्धा पुढे ढकलले गेले किंवा रद्द केले गेले आहेत. भारतातही कोरोन व्हायरसमुळे (Coronavirus) सर्व खेळांच्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 चा हंगाम 29 मार्चपासून होणार होता पण आता त्याला 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आयपीएल (IPL) फ्रँचायझी यांच्यात मंगळवार, 24 मार्च रोजी कॉन्फरन्स कॉलद्वारे बैठक होईल, जिथे आयपीएलच्या 13 व्या सत्रात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी अधिकारी मंगळवारी आयपीएलच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या कॉन्फरन्स कॉलच्या अंतर्गत घेत होईल. सध्या बीसीसीआयचे मुख्यालय बंद आहे, परंतु कॉन्फरन्स कॉलद्वारे हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित केली जाऊ शकते. अशा वातावरणात आयपीएल आयोजित करायची की नाही यावरही चर्चा होईल." (IPL 2020 च्या आयोजनावर मोठं अपडेट, एप्रिल-मे ऐवजी 'या' 3 महिन्यामध्ये केले जाऊ शकते आयोजन)

यापूर्वी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय जुलै ते सप्टेंबर दरम्यान विंडोमध्ये आयपीएल आयोजित करू शकते असे समोर आले होते. सहसा दोन महिने चालणाऱ्या 60 सामन्यांच्या या स्पर्धेचे वेळापत्रक कमी करण्यात येऊ शकते असे पहिले म्हटले जात होते. या जीवघेण्या व्हायरसमुळे उद्रेक कमी न झाल्यास यंदा आयपीएल रद्द होण्याची स्थिती बनली आहे. विश्वभरात 339,640 प्रकरणांची नोंद झाली असून यातील 14,500 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत 7 लोकांचा बळी गेला आहे तर 427 लोक त्यास संक्रमित आहेत. सोमवारी महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि बिहारसह एकूण 30 नवीन प्रकरणे नोंदली गेली. भारतातील बर्‍याच राज्यात पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. सर्व प्रवासी गाड्या आणि आंतरराज्यीय बस सेवा 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.