Coronavirus: क्रिकेटपटू धवल कुलकर्णी म्हणाला सलाम BMC! मुंबई महापालिका म्हणाली 'हे तर आमचे कर्तव्य'

धवल कुलकर्णी याचे आभार मानत पालिकेने म्हटले आहे. आम्ही शक्य तितके प्रयत्न करत आहोत. जेणेकरुन कोरोना व्हायरस नियंत्रणात राहिल. नागरिकांनीही आम्हाला सहकार्य करावे ही आपेक्षा आहे, असे पालिकेने म्हटले आहे.

BMC, Dhawal Kulkarni | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे ते पाहून क्रिकेटपटू धवल कुलकर्णी चांगलाच प्रभावीत झाला आहे. म्हणूनच महापालिका आणि राज्य सरकारच्या कामाबद्दल आभार मानण्यासाठी धवल कुलकर्णी याने 'सलाम' असे म्हणत ट्विट केले आहे. हे ट्विट त्याने मुंबई महापालिका (BMC), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने 'हे तर आमचे कर्तव्यच आहे' असे म्हणत त्याला प्रतिसाद दिला आहे.

क्रिकेटपटू धवल कुलकर्णी याने मुंबई महापालिका, राज्य सरकार यांच्यासोबतच पालिकेत कार्यरत असलेल्या रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी या सर्वांचे आभार मानले आहेत.

धवल कुलकर्णी याने केलेले कौतुक आणि आभार पाहून पालिकेने अत्यंत संयत असा प्रतिसाद दिला आहे. धवल कुलकर्णी याचे आभार मानत पालिकेने म्हटले आहे. आम्ही शक्य तितके प्रयत्न करत आहोत. जेणेकरुन कोरोना व्हायरस नियंत्रणात राहिल. नागरिकांनीही आम्हाला सहकार्य करावे ही आपेक्षा आहे, असे पालिकेने म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुंबई महापालिका कोरोना व्हायरस आतापर्यंतचे सर्व अपडेट्स; पाहा COVID 19 चा तपशील)

मुंबई महापालिका ट्विट

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे शहरांतील मॉल्स, जलतरण तलाव, व्यायामशाळा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर, पुणे येथील अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर ठिकाणची चित्रपटगृहे, यात्रा, उरुस यांवरही बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबई शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पुणे शहरातही आवश्यकता भासल्यास जमावबंदी लागू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.