'तू तर करोना व्हायरसपेक्षाही घातक', क्रिस गेल याने वेस्ट इंडियन सह खेळाडू रामनरेश सरवन याला लगावली फटकार, पाहा Video

क्रिकेट विश्वातील सर्वात स्फोटक फलंदाज क्रिस गेल त्याच्याच देशातील एका माजी खेळाडूवर चिडला आहे. गेलने आपल्या युट्यूब चॅनेलवर आपला संताप व्यक्त लेला. गेलला कॅरेबियन प्रीमियर लीग जमैका थालावास संघातून वगळण्यात आले आहे. अशा स्थितीत त्याने वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू रामनरेश सरवन याच्यावर भडकला.

क्रिस गेल (Photo Credit: Getty)

क्रिकेट विश्वातील सर्वात स्फोटक फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle) त्याच्याच देशातील एका माजी खेळाडूवर चिडला आहे. गेलने आपल्या युट्यूब चॅनेलवर आपला संताप व्यक्त लेला. गेलला कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) जमैका थालावास (Jamaica Tallawahs) संघातून वगळण्यात आले आहे. अशा स्थितीत त्याने वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू रामनरेश सरवन (Ramnaresh Sarwan) याच्यावर भडकला. गेलने सरवनला खूप वाईट माणूस म्हणून संबोधले आणि म्हटले की तू कोरोना विषाणूपेक्षा वाईट आहे, असे म्हणले. गेलने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की जेव्हा मी जमैका संघात परत आलो तेव्हा तुम्ही संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होता. गेल मैदानावर कायम आक्रमक असतो, पण त्याला एखाद्या खेळाडूवर संतापलेलं फार कमी पाहण्यात आले आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगमध्येजमैका थालावासला सोडचिठ्ठी दिल्यावर गेल सेंट ल्युसिया झोक्सकडून खेळणार आहे. (वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंना जानेवारी 2020 पासून नाही मिळाली मॅच फी, जाणून घ्या कारण)

थालावास टीममधून काढण्याचा डाव त्याचा माजी सहकारी रामनरेश सरवान याचाच होता असा दावा गेलने केला आहे. थालावासच्या व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांचे सरवानने कान भरले आणि परिणामी गेलला संघाबाहेर व्हावे लागले, असा आरोप गेलने केला. गेलचा राग अनवार झाला आणि त्याने सरवानला ‘सापा’ची उपमाही दिली. गेल म्हणाला की, “सध्याच्या घडीला, सरवान, तू करोना व्हायरसपेक्षाही घातक आहेस. थालावास संघात काय घडलं याची मला चांगलीच कल्पना आहे. कारण त्या संघात तुझ्या मताला खूप किंमत आहे. तुझं थालावासच्या मालकांशी अगदी घट्टा नातं आहे, याची सर्वांनाच कल्पना आहे. आपण दोघं मित्र आहोत असं तू नेहमी म्हणतोस पण मी केलेला साधा फोनही तू उचलत नाहीस. माझ्या मागच्या वाढदिवशी जमैकामध्ये तूच आपल्या संघाबाबत आणि माझ्याबाबत स्टेजवर चढून चांगलं बोलला होतास. पण सरवान, तू साप आहेस हे आता मला कळून चुकलं आहे. तु अजूनही लहान मुलांसारखा अपरिपक्व आहेस. तू अजूनही लोकांच्या पाठीत सुरा खुपसतो आहेस. तू ही गोष्ट कधी बंद करणार आहेस?”, अशा शब्दात गेलने आपला संताप व्यक्त केला.

गेल पुढे म्हणाला की, “सरवन खेळाडूंना खूप खोटे बोलत असे. या व्यतिरिक्त त्याने परदेशी खेळाडूंना उक्सवले जेणेकरुन ते युवा खेळाडूंसमोर माझी चेष्टा करू शकेल. या कारणास्तव, कार्यसंघाच्या एक बैठकीत जवळजवळ गोंधळ उडाला होता.”

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now