क्रिस गेल याने टी-20 मध्ये झळकावले 22 वें शतक; CPL च्या एका मॅचमध्ये दोन्ही टीमने ठोकले एकूण 'इतके' षटकार

गेलने 116 धावा करत मुख्य भूमिका बजावली. या मॅचमध्ये रेकॉर्ड 37 षटकार लागले. तसेच सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा संयुक्त विक्रम आहे. या सामन्यात गेलच्या जोरदार फलंदाजीमुळे एकाच दिवशी लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही दोनदा मोडला.

क्रिस गेल (Photo Credit: Getty)

'युनिव्हर्स बॉस' च्या नावाने प्रसिद्ध क्रिस गेल (Chris Gayle) याने अनेक दिग्गजांचे रेकॉर्ड मोडले आहेत तर अनेक रेकॉर्ड निर्माण केले आहेत. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला असला तरी त्याच्या फलंदाजीला अजूनही पूर्वीसारखी धार आहे. मंगळवारी वेस्ट इंडीजच्या या क्रिकेटपटूने 62 चेंडूत 116 धावा फटकावल्या आणि गोलंदाजांना संदेश दिला की किमान टी-20 लीगमध्ये गोलंदाजांना त्यांच्या संकटातून मुक्तता मिळणार नाही. तथापि, गेलच्या या दमदार खेळी केली पण, त्याची टीम जमैका थलावाझला पराभवाचा सामना करावा लागला. गेल सध्या सीपीएल (CPL) अर्थात कॅरिबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) मध्ये खेळत आहे. जमैकन थलावास (Jamaica Tallawahs) आणि सेंट किट्स अँड नेव्हिस पैट्रियट्स (St Kitts and Nevis Patriots) यांच्यात मंगळवारी लीगमधील सामना खेळाला गेला. या सामन्यात गेलच्या जोरदार फलंदाजीमुळे एकाच दिवशी लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही दोनदा मोडला. (CPL 2019: शाहरुख खान याने ड्वेन ब्राव्हो याच्यासह केला 'लुंगी डान्स', Video सोशल मीडियात व्हायरल)

या सामन्यात गेलने टी-20 करिअरमधील 22 वे शतक केले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जमैका थलावाझने 241 धावा केल्या. गेलने 116 धावा करत मुख्य भूमिका बजावली. या मॅचमध्ये रेकॉर्ड 37 षटकार लागले. तसेच सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा संयुक्त विक्रम आहे. मागील वर्षी बलख महापुरूष व काबुल जवनान यांच्या संघानेही या सामन्यात 37 षटकार ठोकले होते. गेलने 62 चेंडूत 116 धावा केल्या. गेलने सात चौकार आणि 10 षटकार लगावले. शिवाय, या दोन्ही संघाने 39 ओव्हरमध्ये 483 धावा केल्या. गेलचे सीपीएल मधील चौथे शतक होते.

दरम्यान, गेलचे हे शतक व्यर्थ गेले. कारण सेंट किट्स आणि नेव्हिस पैट्रियट्स संघाने सात चेंडू शिल्लक असताना लक्ष्य पूर्ण कारले आणि दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदविला. सेंट किट्स आणि नेव्हिस पैट्रियट्सने 18.5 षटकांत 6 गडी गमावून 242 धावा करुन सामना जिंकला. या विजयासह सेंट किट्स संघाने आपला पहिला विजय मिळवला तर जमैका संघा आपल्या पहिल्या विजयासाठी संघर्ष करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif