Top Sports Team With Highest Social Media Engagement In May 2023: चेन्नई सुपर किंग्जची जादू कायम, एमएस धोनीचा सीएसके संघ बनला सर्वात जास्त लोकप्रिय
एमएस धोनीच्या संघाचा या वर्षी मे महिन्यातील टॉप-3 संघांमध्ये समावेश आहे. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज.
इंडियन प्रीमियर लीगचा 16वा हंगाम संपला आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले. आयपीएल संपल्यानंतरही महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची भरभराट सुरूच आहे. एमएस धोनीच्या संघाचा या वर्षी मे महिन्यातील टॉप-3 संघांमध्ये समावेश आहे. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज (CSK). चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त, रियल माद्रिद आणि एफसी बार्सिलोना या संघांचा या यादीत टॉप-3 संघांमध्ये समावेश आहे. मे महिन्यात 424 दशलक्ष सोशल मीडिया एंगेजमेंटसह चेन्नई सुपर किंग्स या यादीत अव्वल स्थानावर आहे. मे महिन्यात 345 दशलक्ष सोशल मीडिया एंगेजमेंटसह रिअल माद्रिद फुटबॉल क्लब चेन्नई सुपर किंग्जनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. एफसी बार्सिलोना 332 दशलक्ष सोशल मीडिया प्रतिबद्धतेसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.