CWC Super League Points Table: टीम इंडिया, ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर अशी आहे वर्ल्ड कप सुपर लीग पॉईंट्स टेबलची स्थिती, पाहा लेटेस्ट गुणतालिका

दुसरीकडे, अ‍ॅलेक्स कॅरीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावरील पहिल्या वनडे सामन्यात 133 धावांनी दणदणीत विजय मिळवला. याविजयासह दोन्ही संघांनी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेत आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे.

ऑस्ट्रेलिया-भारत CWC सुपर लीग पॉइंट्स टेबल (Photo Credit: Twitter/ICC)

CWC Super League Points Table: मंगळवार, 20 जुलै रोजी श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) तीन विकेट्सच्या विजयासह टीम इंडियाने (Team India) तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी टीम इंडियाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. दुसरीकडे, अ‍ॅलेक्स कॅरीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन (Australia) संघाने वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावरील पहिल्या वनडे सामन्यात 133 धावांनी दणदणीत विजय मिळवला. याविजयासह दोन्ही संघांनी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगच्या  (ICC Cricket World Cup Super League) गुणतालिकेत आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे. कांगारू संघ आतापर्यंत 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवून 50 पॉईंट्ससोबत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे तर भारतीय संघ चौथ्या स्थानावर असून त्यांनी खेळल्या 8 पैकी 5 वनडे सामने जिंकले आहेत. भारताकडे 49  गुण आहेत. (IND vs SL 2nd ODI: दुसरा वनडे जिंकत टीम इंडियाला डबल फायदा, मालिका खिशात घालत ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानला ओव्हरटेक करत केला विश्वविक्रम)

यासह टीम इंडियाने त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पाचव्या स्थानावर ढकलले. बाबर आजमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाला इंग्लंड दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर बांगलादेशने दुसर्‍या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध विजय नोंदवून पॉईंट टेबलमध्ये आपले स्थान दुसरे स्थान मजबूत केले आहेत. प्रत्येक संघाला विजयासाठी 10 गुण मिळतात, सामन्याचा निकाल न लागल्यास, रद्द किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी पाच गुण दिले जातात. सामन्यात पराभवासाठी एकही गुण मिळत नाही, तर स्लो ओव्हर रेटसाठी गुण देखील वजा केले जातात. टीम इंडियाला एका ओव्हरची पेनल्टी लावण्यात आली आहे.

दरम्यान, श्रीलंकाने पहिले बॅटिंग करत 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 275 धावा केल्या तर प्रयुत्तरात भारतीय संघाने 49.1 ओव्हरमध्ये सात विकेट्स गमवून 277 धावा करून सामन्यासह मालिकाही खिशात घातली. दीपक चाहरने भारताकडून नाबाद 69 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 54 धावांचे योगदान दिले. सामन्यात एकावेळी भारताने 193 धावांवर सात विकेट्स गमावल्या होत्या आणि सामना धवन ब्रिगेडच्या हातून नसताना दिसत होता पण चाहर आणि भुवनेश्वर कुमारच्या अर्धशतकी भागीदारीने संघाला विजयीरेष ओलांडून दिली.