LSG vs RCB Head to Head Record: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड पहा; आरसीबीचा संघ ठरतो वरचढ

आयपीएल 2025 च्या 70 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध खेळणार आहे.

LSG vs RCB Head to Head Record: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड पहा; आरसीबीचा संघ ठरतो वरचढ
RCB (Photo Credit - X)

LSG vs RCB Head to Head Record: आयपीएल 2025 च्या 70 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध खेळणार आहे. बेंगळुरू संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे आणि हा सामना जिंकून त्यांना टॉप-2 मध्ये आपले स्थान निश्चित करायचे आहे. तर लखनौदेखील हा सामना जिंकण्याच्या उद्देशाने खेळेल. दरम्यान, आयपीएलमध्ये एलएसजी आणि आरसीबीचा हेड टू हेड रेकॉर्ड काय आहे ते पाहूयात.

टाटा आयपीएल 2025 (IPL 2025) चा 70 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांचा हा शेवटचा लीग सामना असेल. लखनौ सुपर जायंट्ससाठी हा हंगाम काही खास नव्हता. त्यांनी 13 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 6 जिंकले आणि 7 गमावले. लखनौचा संघ 12 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, आज त्यांचा हंगामातील शेवटाचा सामना असेल. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. पण शेवटच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, आज त्यांमा हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा असेल. हा सामना जिंकून, आरसीबीला टॉप 2 मध्ये आपले स्थान निश्चित करायचे आहे. बेंगळुरूने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 8 जिंकले आणि 4 गमावले.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पाच वेळा केला आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये, आरसीबीने तीन विजयांसह आघाडी घेतली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने उर्वरित दोन्ही सामने जिंकले आहेत.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल 2025 सामना आज 27 मे 2025 रोजी खेळला जाईल. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल 2025 सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. लखनौ विरुद्ध बेंगळुरू यांच्यातील आयपीएल 2025 सामना भारतातील स्टार स्पोर्ट्सनेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. आयपीएल 2025 चा सामना जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर थेट प्रसारित केला जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).