Chalo Dinner Time: विराट कोहली-केविन पीटरसन चॅट दरम्यान अनुष्का शर्माने केली मजेदार कमेंट, इंग्लिश क्रिकेटरच्या प्रतिक्रियेने तुम्हीही व्हाल सहमत

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली सोबत इंस्टाग्राम लाईव्ह चॅट दरम्यानचा एक स्क्रिन शॉट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लाईव्ह चॅट दरम्यान विराटची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्माने चॅटवर कमेंट पोस्ट करत सांगितले की रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आहे.

विराट कोहली आणि केविन पीटरसन (Photo Credit: Instagram)

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सोबत इंस्टाग्राम लाईव्ह चॅट दरम्यानचा एक स्क्रिन शॉट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने (Kevin Pietersen) सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लाईव्ह चॅट दरम्यान विराटची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ने मजेदार कमेंट केली जे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी पुरेशी होती. अनुष्काने चॅटवर कमेंट पोस्ट करत सांगितले की रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट आणि इतर खेळांचे कार्यक्रम ठप्प झाले आहे. अशा स्थितीत खेळाडूही घरी बसले आहेत, पण इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू पीटरसन यावेळी इंस्टाग्राम लाइव्ह चॅटच्या माध्यमातून क्रिकेटर्सची मुलाखत घेत आहे आणि रोहित शर्मानंतर त्याने कोहलीची मुलाखत घेतली. इंस्टाग्रामवरील या चॅटला चाहत्यांकडून खूप पसंत केले गेले. कोहलीने इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान बर्‍याच गोष्टी उघडकीस केल्या. (IPL मध्ये RCB च्या पराभवाचे कारण ते आवडता बॅटिंग पार्टनर; केविन पीटरसनसोबत इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान विराट कोहलीने केले महत्वाचे खुलासे)

कोहली आणि पीटरसन यांच्या लाईव्ह चॅटवर अनुष्काने "चला, ये...रात्रीच्या जेवणाची वेळ झाली" अशी प्रतिक्रिया दिली. चॅटवर अनुष्काची कमेंट येणे सर्वांनाच चकित करणारे होते. अनुष्काच्या या टिप्पणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि मुलाखत घेणाऱ्या पीटरसनने मजेदार उत्तर दिले ज्याच्याशी अधिक जण सहमत असतील. पीटरसनने इंस्टाग्राम अकाउंटवर अनुष्काच्या टिप्पणीचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले की, "जेव्हा बॉस म्हणतो की वेळ संपली आहे, वेळ संपली आहे!" पीटरसनने हा स्क्रीनशॉट शेअर करताना त्यात विराट-अनुष्काला टॅग केले. अनुष्काच्या या कमेंटवर चाहतेदेखील वेगवेगळ्या आणि मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

When the BOSS said time was up, time was up! @anushkasharma @virat.kohli 🤣🤣🤣🤣🤣🤣 Hope you all enjoyed that? Just two dudes hanging out....

A post shared by Kevin Pietersen (@kp24) on

कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रिकेट स्पर्धा आणि मालिका रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेटपटू आपला वेळ घरी घालवत आहेत. अशा स्थितीत विराट आणि पीटरसनने इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटद्वारे चाहत्यांशी संवाद साधला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now