Asia Cup 2025 Schedule: आशिया कपबद्दल मोठी अपडेट, स्पर्धेचे वेळापत्रक कधी येणार, भारत-पाक सामना होणार की नाही? सर्वकाही जाणून घ्या
मिळालेल्य माहितीनुसार, ही स्पर्धा 10 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि युएई.
Asia Cup 2025 Schedule: आगामी आशिया कप 2025 संदर्भात (Asia Cup 2025) एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात आशियाई क्रिकेट परिषद (ACC) या बहुप्रतीक्षित स्पर्धेसाठी वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करू शकते. मिळालेल्य माहितीनुसार, ही स्पर्धा 10 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि युएई.
🚨 ASIA CUP 2025 UPDATE. 🚨
- Asia Cup 2025 likely to start from 10th September with both India and Pakistan taking part. (Cricbuzz). pic.twitter.com/EARuncL092
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 28, 2025
यजमानाबाबत अजूनही संभ्रम?
पूर्वीच्या वृत्तानुसार, पाकिस्तान आणि यूएई यांना सह-यजमान म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता होती, कारण पाकिस्तानी संघ भारतात खेळायला इच्छुक नाही. मात्र, सध्याची माहिती ही अनिश्चितता लवकरच संपवू शकते. ACC ची जुलैमधील बैठक या संदर्भात निर्णायक ठरू शकते. (हे देखील वाचा: Ravi Shastri : 'लॉर्ड्समध्ये आसनक्षमता कमी'; रवी शास्त्रींनी अहमदाबादमधील WTC अंतिम सामन्याच्या ठिकाणावर दिला भर)
भारत-पाकिस्तान संबंध आणि सरकारची भूमिका
भारत-पाकिस्तान दरम्यानचे तणावपूर्ण संबंध लक्षात घेता, भारतीय संघ आशिया कपमध्ये सहभागी होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. तथापि, BCCI च्या सचिव देवजीत सैकिया यांनी भारताच्या सहभागाच्या अफवांना खोडून काढले आहे. BCCI सध्या भारत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहे.
स्पर्धा रद्द झाली तर परिणाम गंभीर
विशेष म्हणजे, ICC आणि ACC च्या आगामी स्पर्धांवर परिणाम होऊ नये म्हणून भारत आणि पाकिस्तान दोघेही आशिया कप 2025 मध्ये सहभागी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेतील सहभाग नाकारल्यास भविष्यातील आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट्समध्ये अडथळे येऊ शकतात.
(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2025 04:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

