Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमार लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार? महत्वाची माहिती आली समोर
भारतीय संघ 18 ते 23 जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
भारतीय संघ पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ 18 ते 23 जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या चार महिन्यांच्या दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली होती. मात्र, या दौऱ्यातून भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे (Bhuvneshwar Kumar) नाव नसल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट इच्छूक नसल्याचे वृत्त समोर आले. यावर भुवनेश्वर कुमारने ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, भुवनेश्वर कुमारने नुकतेच एक ट्वीट केले आहे. यात त्याने असे लिहले आहे की, मी कसोटी क्रिकेट खेळण्यास इच्छूक नसल्याचे अनेक लेख प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. परंतु, मी नेहमी तिन्ही फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी स्वत:ला तयार केले आहे आणि यापुढे करत राहणार. मी आपणांस सुचवितो की, सूत्रांवर आधारित काहीही लिहू नका." हे देखील वाचा- Sagar Rana Murder Case: फरार कुस्तीपटू Sushil Kumar च्या अडचणीत वाढ; सागर राणा हत्येप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी
भुवनेश्वर कुमारचे ट्वीट-
भुवनेश्वर कुमारने भारतीय संघाकडून 2013 साली पहिला कसोटी सामना खेळला होता. परंतु, त्याने आतापर्यंत केवळ 21 सामने खेळले आहे. या 21 सामन्यात त्याने 63 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2018 साली जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता.