IND vs ENG: उपकर्णधार ऋषभ पंतच्या 'त्या' शॉटवर बेन स्टोक्सलाही हसू आवरले नाही (Video)

पहिल्या दिवशी तिन विकेट गमावल्यानंतर भारतीय खेळाडू दबावात खेळतील असे स्टोकला वाटले. मात्र, ऋषभ पंतच्या 'त्या' शॉटवर बेन स्टोक्सलाही हसू आवरले नाही.

IND vs ENG: उपकर्णधार ऋषभ पंतच्या 'त्या' शॉटवर बेन स्टोक्सलाही हसू आवरले नाही (Video)
PC-X

IND vs ENG: ऋषभ पंतला इंग्लंड दौऱ्यासाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. ही मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वांना अपेक्षा होती की तो आता थोडा संयमाने फलंदाजी करेल आणि कमी बेताल फटके खेळेल. पण ऋषभ पंतने (Rishabh Pant) त्याच्या दुसऱ्या चेंडूवर मारलेल्या फटक्यामुळे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सही () हसू आवरू शकला नाही. लीड्समध्ये भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 3 गडी गमावून 359 धावा केल्या आहेत. कर्णधार शुभमन गिलने सलामीवीर यशस्वी जयस्वालसह शतक झळकावले. ऋषभ पंत 65 धावा काढल्यानंतर गिलसोबत क्रिजवर आहे.

यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांच्या जोडीने लीड्स कसोटीत भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ९१ धावा जोडल्या. पण त्यानंतर भारताला 6 चेंडूत दोन धक्के बसले. केएल राहुल 42 धावा करून बाद झाला, तर पदार्पणाचा सामना खेळणारा साई सुदर्शन खातेही उघडू शकला नाही. यानंतर, फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतने पहिल्या चेंडूवर मोठा शॉट मारला नाही. परंतु दुसऱ्या चेंडूवर त्याने समोर चौकार मारण्यासाठी पायांचा वापर केला. पंतने या शॉटने स्पष्ट केले की उपकर्णधार झाल्यानंतर त्याच्यावर काही जबाबदारी निश्चितच आली आहे, परंतु तो खेळण्याची पद्धत बदलणार नाही. पहिल्या दिवशी तिन विकेट गमावल्यानंतर भारतीय खेळाडू दबावात खेळतील असे स्टोकला वाटले. मात्र, झाले उलटेच. या दबावाच्या परिस्थितीत पंतला असे करताना पाहून बेन स्टोक्सलाही हसू आवरता आले नाही. त्याची प्रतिक्रिया आता व्हायरल होत आहे.

व्हिडिओ देखील पाहू शकता-

या शॉटनंतर, ऋषभ पंत शांत झाला आणि त्याने गिलसोबत भागीदारी केली. या दरम्यान, शुभमन त्याला खेळाबद्दल समजावून सांगतानाही दिसला. ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांच्यात 138 धावांची भागीदारी झाली आहे. गिल 127 आणि पंत 65 धावांवर नाबाद आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2025 09:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).