IPL 2021 आणि CPL टूर्नामेंटच्या तारखांमध्ये टक्कर, कॅरेबियन लीग लवकर सुरु करण्यासंदर्भात BCCI व WI बोर्डात चर्चा

COVID-19 महामारीमुळे मध्यभागी निलंबित करण्यात आलेलाइंडियन प्रीमियर लीगचा 14 वा हंगाम बीसीसीआयने शनिवारी युएईमध्ये सप्टेंबर महिन्यात खेळण्यात येण्याची पुष्टी केली.

किरोन पोलार्ड आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

सप्टेंबरमध्ये युएईमध्ये आयपीएलच्या (UAE) पुनरारंभासाठी खेळाडूंच्या बबल-टू-बबल हस्तांतरणाची खात्री करण्यासाठी बीसीसीआय (BCCI) क्रिकेट वेस्ट इंडीजला (Cricket West Indies) कॅरेबियन प्रीमियर लीगची (Caribbean Premier League) सुरुवात आठवडा किंवा 10 दिवसांनी करण्याचा प्रयत्न करीत आहे. COVID-19 महामारीमुळे मध्यभागी निलंबित करण्यात आलेला इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 14 वा हंगाम बीसीसीआयने शनिवारी युएईमध्ये सप्टेंबर महिन्यात खेळण्यात येण्याची पुष्टी केली. दुसरीकडे, सीपीएल (CPL) 28 ऑगस्ट पासून सुरु होऊन 19 सप्टेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल तर 18 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान आयपीएलचे उर्वरित सामने होण्याची शक्यता आहे. “आम्ही क्रिकेट वेस्ट इंडीजशी चर्चा करीत आहोत. आम्हाला आशा आहे की जर काही दिवसांपूर्वी सीपीएल संपला तर दुबईत सर्व खेळाडूंचे बबल बदली होण्यास आणि बरीच तीन दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण होण्यास मदत होईल,” बीसीसीआयच्या एका सूत्रांनी रविवारी पीटीआयला सांगितले. (IPL 2021 Phase-2: इंग्लंडने वाढवली BCCI ची डोकेदुखी, आयपीएलसाठी वेळापत्रकात बदल करण्याबाबत ECB प्रमुखने स्पष्ट केली भूमिका)

दरम्यान, जर बीसीसीआय आणि क्रिकेट वेस्ट इंडिज यांच्यातील तारखांबाबत चर्चा अपयशी ठरली, तर काही बडे खेळाडू आरंभिक काही सामन्यातून बाहेर पडू शकतात. पाच वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सचा प्रभावशाली अष्टपैलू किरोन पोलार्ड, क्रिस गेल, अष्टपैलू ड्वेन ब्रावो, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, निकोलस पूरन, फॅबियन अ‍ॅलन, सुनील नारायण, त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम असे टी-20 क्रिकेटचे स्टार क्रिकेटपटू दोन्ही लीगमध्ये सहभागी आहेत. आगामी आवृत्ती सीपीएलचा नववा सीझन असेल आणि जगभरातील काही सर्वात मोठे सुपरस्टार्स या लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. शनिवारी बीसीसीआयच्या एसजीएम दरम्यान आयपीएलच्या पुनर्रचनेस मान्यता देण्यात आली होती. बायो बबलमध्ये कोविड-19 प्रकरणांमुळे लीग निलंबित झाल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत लीगच्या दुसऱ्या टप्प्याबाबत घोषणा करण्यात आली. 2 मे रोजी आयपीएलचा यंदाचा हंगाम स्थगित करण्यात आला होता.

दुसरीकडे, यापूर्वी आयपीएलच्या उर्वरित हंगामात इंग्लंड खेळाडू सहभाग घेणार नसल्याचे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे संचालक अ‍ॅशली जाईल्स यांनी स्पष्ट केले होते. “आमचे पूर्ण वेळापत्रक आहे. आम्ही सप्टेंबरमधील पाचव्या कसोटी सामन्याच्या नंतर 19 किंवा 20 सप्टेंबर रोजी बांग्लादेशला रवाना होणार आहे. आमच्याकडे पाकिस्तानसह आणि जिथे टी-20 विश्वचषक होणार तिथपर्यंत संपूर्ण वेळापत्रक आहे. आम्हाला या वेळी काही खेळाडूंना ब्रेक देणार आहोत. पण खेळाडूंना ब्रेक देण्याचा हेतू त्यांनी जाऊन इतरत्र क्रिकेट खेळायचे नाही आहे. आम्हाला आता आपले वेळापत्रक व्यवस्थापित करावे लागेल, जेणेकरुन आमचे खेळाडू टी-20 वर्ल्ड कप आणि अ‍ॅशेससाठी शक्य तितक्या चांगल्या स्थितीत पोहोचेल,” त्यांनी पुढे म्हटले.