NADA च्या रडारावर येणार भारतीय क्रिकेटपटू, नाडाकडून होणार क्रिकेटपटूंची डोपिंग टेस्ट

केंद्रीय क्रीडा सचिव आर एस जुलानिया म्हणाले की, "बीसीसीआयला नाही म्हणायला विवेकी नाही. सर्व एकसारखे आहेत, सर्वांना समान नियम पाळायला हवेत."

बीसीसीआय | (Photo Credits: PTI)

भारतातील इतर क्रीडा संघटनांप्रमाणेच बीसीसीआय (BCCI) देखील आता नाडा (NADA), नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीच्या (National Anti Doping Agency) कक्षेत येणार. केंद्रीय क्रीडा सचिव आर एस जुलानिया (RS Julaniya) म्हणाले की, “बीसीसीआयला नाडाच्या नियमाअंतर्गतच काम करावं लागेल. तुम्हाला नाही म्हणण्याचा अधिकारच नाहीये. प्रत्येक क्रीडा संस्थांसाठी एकच नियम बनवण्यात आला आहे आणि सर्वांना तो पाळावाच लागेल.” मागील महिन्यात टीम इंडियाचा उगवता तारा पृथ्वी शॉ याच्या डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यानंतर क्रीडा मंत्रायलाने बीसीसीआय सीईओ राहुल जौहरी (Rahul Johri) यांना कठोर शब्दांत पत्र लिहिले होते. बीसीसीआयला डोपिंग टेस्ट करण्याचा आधिकार नाही. त्यांच्या डोपिंग टेस्टला भारत सरकार आणि विश्व डोपिंग संस्थाकडून (वाडा) आधिकृत मान्यता दिलेली नाही. क्रीडा मंत्रालयाने 26 जून रोजी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्राच्या हवाल्याने इंडियन एक्‍स्प्रेस बीसीसीआयला फटकारल्याचे वृत्त दिले आहे. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय डोपिंग संस्थेशी (नाडा) निगडित नसल्यामुळे बीसीसीआय आणि सरकारमध्ये वाद सुरू होते. (डोपिंग टेस्टवरून Sports Ministry ने BCCI ला खडसावले, म्हणाले तुम्हाला टेस्ट करवण्याचा अधिकार नाही)

दरम्यान, बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी शुक्रवारी क्रीडा अधिकाऱ्यांची भेट घेतील. जोहरी यांनी दक्षिण आफ्रिका ए आणि महिला संघाच्या भारत दौर्‍यासाठी मान्यता घेण्यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये डोपिंग टेस्टबद्दल सकरात्मक चर्चा झाली. त्यामुळे आता भारतीय क्रिकेटपटूंना 'नाडा' चे सर्व नियम आणि अटी लागू होतील.  18 मार्च रोजी बीसीसीआयने चाचणी आधारावर सहा महिन्यांसाठी नाडाबरोबर स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, क्रीडा मंत्रालयाने तो पूर्णपणे नाकारला.

अधिक तपशीलाची प्रतीक्षेत...