IPL 2021: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल 2021 संदर्भात घेतला मोठा निर्णय

मात्र, संपूर्ण देशात पुन्हा कोरोना संकटाने डोके वर काढले आहे. यामुळे यावर्षी आयपीएलची स्पर्धा कशी खेळवली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आयपीएल 2021 ट्रॉफी (Photo Credit: Instagram/iplt20)

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2021) चौदावा हंगाम सुरु होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, संपूर्ण देशात पुन्हा कोरोना संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामुळे यावर्षी आयपीएलची स्पर्धा कशी खेळवली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याचपार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) महत्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. आयपीएलच्या स्पर्धा खेळवण्यासाठी 6 ठिकाण निश्चित करण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे, ही स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे. तसेच खेळाडूंसाठी बायो-बबल तयार करण्यात आले आहेत. याशिवाय, प्रत्येक संघाच्या खेळाडूंमध्ये वाढ करण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

कोरोना संकटामुळे 2020 ची आयपीएल स्पर्धा भारताबाहेर संयुक्त अरब आमिराती येथे खेळवण्यात आली होती. आता सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलवर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. नुकतीच आयपीएलमधील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. हे देखील वाचा-IPL 2021: आयपीएलचा पुढील हंगाम सुरु होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; ऑलराउंडर अक्षर पटेल याला करोनाची लागण

एएनआयचे ट्वीट-

आयपीएल स्पर्धा 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. मुंबईत ज्या संघांचे सामने आहेत ते संघ शहरात दाखल झाले आहेत. नियमानुसार संबंधित संघांचे सर्व सदस्य बायो बबलमध्ये आहेत. तसेच कोरोना झालेले दोन क्रिकेटपटू आणि वानखेडेचे कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत.