बीसीसीआय (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विश्वचषक स्पर्धेसाठी एक उपसमिती स्थापन केली आहे. पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती राज्य संघटनांना देण्यात आली आहे. मंडळाने स्थळांची देखरेख करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांना अनुदान देण्यासाठी ही उपसमिती स्थापन केली आहे. यामध्ये अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, खजिनदार आशिष सेहलर, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सहसचिव देवजित सैकिया यांच्याकडे सराव खेळांच्या आयोजनासह 12 ठिकाणांच्या देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय, पायाभूत सुविधांवरील अनुदानासाठी शिफारशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांच्या अनुदानासाठी समितीमध्ये आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमाळ, माजी खजिनदार अनिरुद्ध चौधरी, माजी सर्वोच्च परिषदेचे सदस्य प्रभातेज भाटिया आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सचिव ए शंकर यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. (हे देखील वाचा: IND vs WI 1st ODI 2023: कसोटीनंतर आता टीम इंडियाचा वनडेमध्ये दिसणार जलवा, वाचा मालिकेशी संबंधित संपुर्ण माहिती)

दिल्ली आणि धर्मशाळेचे प्रभारी जय शहा

क्रिकबझच्या बातमीनुसार, रॉजर बिन्नी यांना अहमदाबाद आणि चेन्नईची जबाबदारी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, अहमदाबाद येथे 19 नोव्हेंबर 2023 रोजी होणार्‍या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना, भारत-पाकिस्तान सामना आणि अंतिम सामना यासह अनेक महत्त्वाच्या सामन्यांचे आयोजन केले जाईल. बीसीसीआयचे सचिव जय शाह हे दिल्ली आणि धर्मशाळेचे प्रभारी आहेत, तर कोषाध्यक्ष आशिष सेहलर हे पुणे, लखनौ आणि गुवाहाटीची जबाबदारी पाहतील. उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे हैदराबाद आणि बेंगळुरू या दक्षिणेकडील शहरांची देखरेख करतील. तर सहसचिव देवजीत सैकिया यांच्याकडे मुंबई, कोलकाता आणि तिरुअनंतपुरमची जबाबदारी देण्यात आली आहे.

या 10 शहरात होणार सामने 

महत्त्वाचे म्हणजे, अहमदाबाद, मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, लखनौ आणि धर्मशाला विश्वचषक स्पर्धेचे मुख्य सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि त्रिवेंद्रम सराव सामन्यांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. राज्य संघटनांना पाठवलेल्या निवेदनात जय शहा म्हणाले, “अहमदाबाद येथे 27 मे रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेनुसार पदाधिकाऱ्यांनी समित्यांची स्थापना केली होती. आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 आणि पायाभूत सुविधा आणि अनुदान (sic) साठी पदाधिकारी दोन उपसमिती तयार करतील, असा निर्णय घेण्यात आला.

कामासाठी 50 कोटी रुपये देण्याचा निर्णय

मंगळवारी राज्य युनिट्सना पाठवलेल्या मेलमध्ये, बीसीसीआय सचिव म्हणाले- “आम्ही आमची सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या उपसमित्यांनी परिश्रमपूर्वक काम करण्याची अपेक्षा करतो. एकत्रितपणे आपण आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 ला भव्य यश मिळवून देऊ शकतो आणि भारतीय क्रिकेटमधील पायाभूत सुविधा आणि विकासाचा दर्जा आणखी उंच करू शकतो.” बीसीसीआयने बाह्य एजन्सी नियुक्त केली आहे आणि स्टेडियम, मुख्यतः कॉर्पोरेट बॉक्स, ड्रेसिंग रूम आणि आऊटफिल्ड्सच्या सजवण्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.