BBL 2019-20: राशिद खान याने बिग बॅश लीगमध्ये हॅटट्रिक घेत केला कहर, नोंदवले अनेक रेकॉर्डस्, पाहा Video

स्ट्रायकर्सचा फिरकीपटू राशिद खानने सिक्सर्सविरूद्ध हॅटट्रिक घेत इतिहास रचला आहे. टी-20 क्रिकेटमधील राशिदची ही तिसरी हॅटट्रिक आहे आणि असे करणारा तो 5 वा खेळाडू ठरला आहे.

राशिद खान (Photo Credit: Twitter/BBL)

बुधवारी बिग बॅश लीग (Big Bash League) मध्ये अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) आणि सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) यांच्यात खेळलेला सामना मनोरंजकपणे संपुष्टात आला. कमी धावसंख्येचा या सामन्यात प्रेक्षकांना चढ-उतार पाहायला मिळाले. पण शेवटी सिडनी सिक्सर्सने 18.4 षटकांत आठ गडी गमावून 136 चे लक्ष्य गाठले. स्ट्रायकर्सचा फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) याने हॅटट्रिकच्या सहाय्याने निश्चित असलेला पराभव थोड्या काळासाठी थांबवला, परंतु शेवटी तो आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद सध्या ऑस्ट्रेलियाच्या घरगुती बिग बॅश लीगमध्ये जोरदार प्रदर्शन करत आहे. स्ट्रॉकर्सकडून खेळताना त्याने सिक्सर्सविरूद्ध हॅटट्रिक घेत इतिहास रचला आहे. बीबीएल (BBL) मध्ये हॅटट्रिक घेणारा राशिद आता पहिला परदेशी खेळाडू बनला आहे, शिवाय टी-20 क्रिकेटमधील राशिदची ही तिसरी हॅटट्रिक आहे आणि असे करणारा तो 5 वा खेळाडू ठरला आहे. (BBL 2019-20: टॉम बंटन याने बिग बॅश लीगमध्ये सलग 5 षटकार ठोकत झळकावले दुसरे वेगवान अर्धशतक)

अकराव्या षटकातील पाचव्या बॉलवर, रशीदला प्रथम जेम्स व्हिन्स (James Vince) याला 27 धावांच्या वैयक्तिक धावात विकेटच्या मागे अ‍ॅलेक्स कॅरी याच्या कॅच आऊट केले आणि पुढच्याच चेंडूवर त्याने जॅक एडवर्डस (Jack Edwards) गोल्डन डकवर एलबीडब्ल्यू बाद केले. यानंतर, जेव्हा रशीद डावाचा 13 वा ओव्हर घेऊन आला तेव्हा त्याने पहिल्या चेंडूवर गुगली टाकून जॉर्डन सिल्क (Jordan Silk) याला बोल्ड करून हॅटट्रिक पूर्ण केली. हॅटट्रिकनंतर राशिदने काही विक्रमांचीही नोंद केली. या हॅटट्रिकमुळे राशिद बिग बॅश लीगमध्ये हॅटट्रिक करणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला. शिवाय, ही त्याच्या कारकिर्दीतील पाचवी हॅटट्रिक होती. अमित मिश्रा, अँड्र्यू टाय, आंद्रे रसेल आणि मोहम्मद सामी यांनी यापूर्वीही अशी कामगिरी केली आहे. या सामन्यात राशिदने चार गडीही बाद केले आणि पहिल्यांदा परदेशी टी-20 लीगमध्ये अशी कामगिरी केली. या सामन्यात राशिदने 22 धावांवर 4 गडी बाद केले. दुसरीकडे, आजचा सामान राशिदसाठी खास होता. हा राशिदचा 200 वा टी-20 सामना होता.

रशीदने यापूर्वी जमैका थलाईवासविरूद्ध 2017 कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये सलग तीन चेंडूत तीन गडी बाद केले होते. राशिदने 4 विकेट्स घेतल्या परंतु त्यानंतरही त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. सिडनीला 12 चेंडूत 11 धावा हव्या होत्या आणि त्यांचे केवळ 2 गडी शिल्लक होते. जोश हेजलवुड याने 3 चेंडूत 3 चौकारांसह सिक्सर्सला विजय मिळवून दिला. 8 व्या सामन्यात सिक्सर्सचा 6 वा विजय आहे आणि संघाने टेबलमध्ये प्रथम स्थान मिळविले आहे, तर स्ट्राईकर्सचा हा 7 व्या सामन्यातील तिसरा पराभव होता.