Batsmen Out on 199 in Tests: दुर्दैवच की! बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये 199 धावसंख्येवर बाद झाला 'हा' दिग्गज, कमनशिबी फलंदाजांच्या यादीत झाला सामील

कसोटी कारकिर्दीतील पहिले दुहेरी शतक फक्त 1 धावाने हुकले. कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदा दुहेरी शतकाच्या जवळ पोहोचलेला डु प्लेसिस 199 धावांवर झेलबाद झाला. यासह, त्याचे नाव सर्व दुर्दैवी फलंदाजांच्या यादीत झाला ज्यांचे फक्त एका धावाने दुहेरी शतक हुकले.

फाफ डु प्लेसिस (Photo Credit: Twitter/ICC)

श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) दुर्दैवी ठरला. कसोटी कारकिर्दीतील पहिले दुहेरी शतक फक्त 1 धावाने हुकले. कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदा दुहेरी शतकाच्या जवळ पोहोचलेला डु प्लेसिस 199 धावांवर झेलबाद झाला. यासह, त्याचे नाव सर्व दुर्दैवी फलंदाजांच्या यादीत झाला ज्यांचे फक्त एका धावाने दुहेरी शतक हुकले. विशेष म्हणजे या यादीत तो भारतीय, ऑस्ट्रेलियन आणि पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश आहे. माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) आणि फलंदाज केएल राहुल (KL Rahul) यांचा देखील या यादीत समावेश आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध सेंच्युरियन येथे खेळला जात आहे. पहिल्या डावात श्रीलंकेचा पहिला डाव 396 धावांवर दक्षिण आफ्रिकेने धावांचा डोंगर उभारला. पहिल्या डावात तिसर्‍या दिवशी संघाने माजी कर्णधार डू प्लेसिसच्या बळावर 600 धावसंख्या गाठली.

या सामन्यात डु प्लेसिसचे पहिले कसोटी दुहेरी शतक अवघ्या एका धावणे हुकले. `कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी डु प्लेसिसपृवी दहा वेळा असे घडले आहे, की फलंदाज वैयक्तिक 199 धावांवर बाद झाले आहे. विशेष म्हणजे, डु प्लेसिसचा सहकारी डीन एल्गारचा देखील या यादीत समावेश आहे. दरम्यान, डु प्लेसिसने 276 चेंडूच्या आपल्या खेळीत 24 चौकार ठोकले आणि दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 621 धावांची तगडी धावसंख्या उभारली. भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे तर मोहम्मद अझरुद्दीन 17 डिसेंबर, 1986 रोजी श्रीलंकाविरुद्ध कानपूर येथील सामन्यात 199 धावांवर बाद झाले होते. त्यांनतर केएल राहुल 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटी सामन्यात धावांवर बाद झाला होता. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, याच सामन्यात करुण नायरने नाबाद 303 धावांची जबरदस्त खेळी केली होती.

दुसरीकडे, डु प्लेसिसबद्दल बोलायचे झाले तर सेंचुरियन टेस्ट मॅच दरम्यान माजी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराने कसोटी क्रिकेटमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी त्याच्या खात्यात 3901 धावा होत्या आणि 99 धावा पूर्ण केल्यावर त्याने चार हजार धावांचा आकडा गाठला. शिवाय, श्रीलंकाविरुद्ध या सामन्यात खेळलेल्या 199 धावांचा डाव आता त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा डाव बनला आहे. तत्पूर्वी, त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 137 धावा होती.