MPL 2025: धावा काढताना फलंदाजांची जोरदार टक्कर; प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ (Video)

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फलंदाजांची धावांसाठी पळक असताना एकमेकांना टक्कर होते.

MPL 2025: धावा काढताना फलंदाजांची जोरदार टक्कर; प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ (Video)
PC-X

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये फलंदाजांची धावांसाठी पळक असताना एकमेकांना टक्कर होते. रायगड रॉयल्स-कोल्हापूर टस्कर्स (Raigad Royals vs Kolhapur Tuskers)यांच्यात हा सामना होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावले. कारण, फलंदाजांमध्ये जोरदार टक्कर झाली. त्यातही विरोधी संघाने फलंदाजांना धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षेत्ररक्षण संघ या प्रयत्नात अपयशी ठरला आणि दोन्ही फलंदाज वेळेत आपापल्या जागेवर पोहोचले. या दरम्यान, प्रसिद्ध खेळाडू राहुल त्रिपाठीच्या थ्रोमुळे फलंदाजांनाही ओव्हर थ्रोचा चौकार मिळाला.

शुक्रवारी पुण्यात एमपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना पार पडला. रायगड रॉयल्सने कोल्हापूर टस्कर्सचा सहा विकेट्सने पराभव केला. रॉयल्सने सहा विकेट्सने विजय मिळवला आणि या निकालामुळे त्यांना ईगल नाशिक टायटन्सविरुद्ध अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या शर्यतीतही स्थान मिळाले. सामनादरम्यान, रायगडच्या फलंदाजांनी दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसरी धाव घेताना दोघांची नजर चेंडूवर होती आणि ते एकमेकांवर आदळले. दोन्ही फलंदाज जमिनीवर पडले. याचा फायदा घेण्याचा विचार करून, कोल्हापूर संघाने दोघांनाही धावबाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु विकेटकीपरच्या चुकीमुळे आणि राहुल त्रिपाठीच्या खराब थ्रोमुळे फलंदाज बाद झाले नाही.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कोल्हापूरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 164/7 धावा केल्या. ज्यामध्ये अंकित बवेने अर्धशतक झळकावले आणि 50 चेंडूत 57 धावा केल्या, ज्यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. रायगडकडून निखिल कदमने तीन विकेट्स घेतल्या. रायगड संघाने 165 धावांचे लक्ष्य 2 चेंडू आणि 6 विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले.

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2252 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).