बांग्लादेशी क्रिकेटपटू सैफ हसन याला भारतात राहण्यासाठी भरावा लागला तब्बल 21 हजार रुपयांचा दंड, जाणून घ्या कारण
बांग्लादेशचा राखीव सलामी सलामी फलंदाज सैफ हसन मायदेशी परतण्यासाठी कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला, तेथे वैध व्हिसा दाखविण्यात अपयशी ठरला. सैफला ढाका येथील भारतीय उच्चायोगाकडे 21,600 रुपयांचा दंड भरावा लागला.
तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांमध्ये बांग्लादेश (Bangladesh) संघाला टीम इंडियाच्या हातून जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 ने जिंकली तर कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. ठरलेल्या व्हिसा मुदतीपलीकडे भारतात (India) राहण्यासाठी बांग्लादेशचा राखीव सलामी सलामी फलंदाज सैफ हसन (Saif Hasan) याला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. कोलकातामध्ये भारत आणि बांग्लादेश मालिकेचा दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला गेला. 22 नोव्हेंबरला हा सामना सुरू झाला आणि 24 नोव्हेंबरला पहिल्या सत्रात संपला. आणि दुसर्या दिवशी म्हणजेच 25 नोव्हेंबरला सैफ मायदेशी परतण्यासाठी कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला, तेथे वैध व्हिसा दाखविण्यात अपयशी ठरला. यानंतर, त्याला आवश्यक प्रक्रियेचा अवलंब करण्यास सांगितले गेले.
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, विमानतळावर थांबल्यावर आल्याने सैफला प्रक्रियेला सामोरे जावे लागले आणि याच्या अंतर्गत त्याला ढाका येथील भारतीय उच्चायोगाकडे 21,600 रुपयांचा दंड भरावा लागला. दंड भरल्यानंतर त्याला एक्झिट व्हिसा उपलब्ध करुन देण्यात आला होता. या सर्व औपचारिकता संपल्यानंतर अखेर सैफ बुधवारी 27 नोव्हेंबरला बांग्लादेशला परतला. रविवारी मध्यरात्रीपर्यंत वैध असलेला व्हिसा क्रिकेटपटूला जूनमध्ये देण्यात आला होता, हा व्हिसाची मुदत संपली असल्याचे हसन किंवा बांग्लादेशच्या लॉजिस्टिक विभागाच्याही लक्षात आले नाही. 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रातील भाजपाप्रणीत सरकारने काही तासांपेक्षा जास्त वेळ भारतात राहिल्याबद्दलच्या आर्थिक दंडात बदल केल्यावर हा दंड आकारण्यात आला आहे. बांग्लादेश संघाची पहिली तुकडी रविवारी रवाना झाली तर दुसर्या तुकडीत ज्यात हसनचा समावेश आहे तो सोमवारी रवाना झाला.
महमूदुल्लारियाद याच्या नेतृत्वात दिल्ली टी-20 सामन्यात बांग्लादेश संघाने विजयासह दौर्याची सुरूवात केली. मात्र, यानंतर भारतीय संघाने राजकोट आणि नागपूरमध्ये झालेले टी-20 सामने जिंकून बांग्लादेशच्या मालिका जिंकण्याचे स्वप्न भंग केले. यानंतर दोन्ही संघांदरम्यान कसोटी मालिका सुरू झाली, ज्यामध्ये टीम इंडियाने इंदोरमध्ये पहिला सामना डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला, तर कोलकातामधील डे-नाईट टेस्टमध्ये टीम इंडियाने डाव आणि 46 धावांनी विजय मिळविला आणि बांग्लादेशचा मालिकेत 2-0 ने क्लीन-स्वीप केला.