BAN vs SCO ICC Women T20 World Cup 2024: वुमन्स टी20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशची विजयी सलामी; बांगलादेशचा स्कॉटलंडवर 16 धावांनी विजय
या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशचे 119 धावांचे आव्हान पूर्ण करताना स्कॉटलंडचा डाव 103 वर संपूष्टात आला.
BAN vs SCO ICC Women T20 World Cup 2024: वुमन्स टी 20 क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशचे 119 धावांचे आव्हान पूर्ण करताना स्कॉटलंडचा डाव 103 वर संपूष्टात आला. बांगलादेशकडून शाथी राणी आणि मुर्शिदा खातुन ही जोडी मैदानात उतरली. त्यांनी 4.3 षठकात 26 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. शाथी राणी 29 धावांवर खेळत असताना कॅथरिन फ्रेझरने तिची विकेट काढली. शोभना मोश्तरीने डाव पुढे नेत 38 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 36 धावा केल्या शोमा अक्तर आणि रितू मोनी अवघ्या 5 धावा करून तंबूत परतले. (हेही वाचा: ICC Woman T20 World Cup 2024: बांगलादेशने स्कॉटलंडसमोर विजयासाठी ठेवलं 119 धावांचं आव्हान)
स्कॉटलंडकडून सारा ब्राइस हीने सर्वाधिक 49 धावा केल्या. सारा ब्राइस हीने 52 चेंडूत एक चौकार झळकावत 49 धावा केल्या. त्यानंतर कॅथरीन ब्राइस आणि आयल्सा लिस्टर यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. कॅथरीन ब्राइस हिने 2 चौकार झळकावले. स्कॉटलंडसाठी सास्किया हॉर्लेने सर्वाधिक तीन बळी घेतले. सास्किया हॉर्लेशिवाय कॅथरीन ब्राइस, ऑलिव्हिया बेल, कॅथरीन फ्रेझर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी स्कॉटिश संघाला 20 षटकात 120 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या स्कॉटिश संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 12 धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला.
बांगलादेशचा स्कॉटलंडवर 16 धावांनी विजय
स्कॉटिश संघाला 20 षटकांत सात गडी गमावून केवळ 103 धावा करता आल्या. बांगलादेशसाठी रितू मोनीने शानदार गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या. रितू मोनीशिवाय मारुफा अख्तर, नाहिदा अख्तर, फहिमा खातून, राबेया खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.