Tiger Robi Viral Video: बांगलादेशी फॅन 'टायगर रॉबी'ने भारताविरुद्ध वक्तव्य केल्याने नेटकरी संतापले; व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बांगलादेशी चाहता टायगर रॉबी भारताबद्दल वाईट बोलतांना दिसत आहे.
Bangladesh Fan Tiger Robi On India: कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान एक अतिशय मनोरंजक घटना पाहायला मिळाली. सामन्यादरम्यान बांगलादेशचा सुपर फॅन रबी-उल-इस्लाम उर्फ टायगर रॉबीसोबत भांडण झाल्याची बातमी आली. तथापि, नंतर तपासात असे दिसून आले की रॉबीवर हल्ला झाला नव्हता, उलट त्याची प्रकृती खालावली होती. (हेही वाचा - IND vs BAN 2nd Test Kanpur: बांगलादेशच्या जबरा चाहत्यांसोबत भारतीय चाहत्यांची हाणामारी, नंतर पोलिसांना सापडला या अवस्थेत…पाहा व्हिडिओ )
आता रॉबीने भारताविरोधात विषारी वक्तव्य केले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बांगलादेशी चाहता टायगर रॉबी भारताबद्दल वाईट बोलतांना दिसत आहे. भारत आपला शत्रू असल्याचे रॉबीने म्हटले आहे. व्हिडिओमध्ये टायगर रॉबी म्हणाला, "भारत बांगलादेशचा मित्र कधीच असू शकत नाही.
भारत आमचा शत्रू आहे. त्यांना बांगलादेशची प्रगती नको आहे. अफगाणिस्तानला साथ द्या पण भारताला नाही. मला त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळाली नाही. भारताचे सुधीर बाबू. बांगलादेशी लोक नेहमी माझ्यासोबत असतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे टायगरने हे विधान बंगाली भाषेत दिले असून, व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हे विधान लिहिले आहे.
पाहा व्हिडिओ -
मेडिकल व्हिसावर आला होता भारतात
कानपूरमध्ये जेव्हा रॉबीवरील हल्ल्याचे प्रकरण पुढे आले तेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला, ज्यामध्ये टायगर रॉबी मेडिकल व्हिसावर भारतात आल्याचे आढळून आले. मात्र, आता बांगलादेशी चाहत्याला बांगलादेशात परत पाठवण्यात आले आहे.